बार्शी रेशनिंग गहू तांदूळ घोटाळा ? खरंच माल खरेदी करणारे की माल विकणारे गुन्हेगार
सध्या बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाची चर्चा कमी पण रेशनिंगचा गहू आणि तांदूळ किती सापडला याचीच चर्चा जास्त आहे यामागे खरे सूत्रधार कोण, कोणाला अटक झाली पाहिजे.

कोणाच्या दुकानात माल सापडला तो कोणत्या गटाचा मग त्याला आशीर्वाद कोणाचा असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत काही जण वैयक्तिक मत मांडताना न्यायाधीश असल्यासारखे गुन्हेगारांना कडक शासन झालं पाहिजे असे बोलत आहेत गोरगरिबांच्या तोंडातील घास हिस्काऊन नेल्यामुळे अनेकांना गरिबांबद्दल फारच कळवळा आला आहे पण खरंच माल खरेदी करणारे गुन्हेगार, की माल विकणारे हा प्रश्न कायम निरुत्तर राहणार .
आज बार्शी तालुक्यात जवळपास शेकडो क्विंटल तांदूळ व गहू सापडला हा गहू व तांदुळ बाजारात कसा आला कोणी आणला याचेही परीक्षण व्हायला हवे.
बार्शी शहर व तालुक्यातील अनेक रेशनिंग दुकानदार यांची याबाबत चौकशी होईलही पण निष्पन्न काय होईल यात शंका आहे.

कारण 2013 च्या सर्वेनुसार बार्शी तालुक्यात ज्या कुटुंबाची नोंद झाली त्याच कुटुंबांना रेशनचा माल मिळत आहे यानंतर ची अनेक कुटुंब अजूनही या मालापासून वंचित आहेत त्यात APL व BPL कार्डधारक आहेत पण रेशन दुकानात फक्त BPL किंवा अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच माल मिळतो बाकीचे इकडे फिरकतही नाहीत.

यात अनेक लाभार्थी असे आहेत जे रेशनचा माल मिळाल्यानंतर बार्शी शहरातील अनेक फड्यांवर प्रतिकिलो 17 रुपयांनी विक्री करतात असे अनेक फडीधारक राजरोसपणे हा व्यवसाय करतात व ह्या फडीधारकांचा माल कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापाऱ्यांच्याकडे जातो याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही या गोरगरीब लोकांची काळजी करणाऱ्यांनी कधी या कार्डधारकांनाही विचारावे की तुम्ही हा माल खात नसाल तर विकता का?
त्याचे उत्तर काय येईल हे गोरगरिबांची काळजी करणाऱ्यांनीही करावी 3 रुपये किलोने मिळणारा माल जर 17 रुपयांनी विकला जात असेल तर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी हे कार्डधारक आपला माल विकतात हे त्रिवार सत्य आहे यात काही रेशन दुकानदारही शिल्लक माल विकत असतील पण सध्या त्यांना मिळत असलेला माल व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनच्या प्रयत्नाने अनेक कार्डधारक हुशार झालेले आहेत.
व आपला हक्क कधीही सोडत नाहीत त्यामुळे एवढा माल तालुक्यात मिळणे हाही चर्चेचा विषय आहे
दुसरी महत्वाची गोष्ट उस्मानाबाद जिल्ह्यातील हा माल बार्शीत आला कसा बार्शीतून पनवेल पर्यंत गेला कसा आज कर्तव्यावर असणारे जागरूक पोलीस हा माल पनवेलपर्यंत जाईतोपर्यंत काय करत होते आणि पोलिसांना माहीत नव्हते का की हा माल कुठला आहे की जाणीवपूर्वक डोळेझाक केली मग आता कर्तव्यदक्ष कसे झाले याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
हे माझं वैयक्तिक मत आहे आपली मत वेगळी असू शकतात पण काही गोष्टी बारीक तपासल्या पाहिजेत आणि राज्यात हा काही पहिलाच घोटाळा नाही गुगलवर जाऊन फक्त रेशन धान्य घोटाळा एवढंच लिहा राज्यातील अनेक प्रकरण दिसतील पण आत्तापर्यंत यामध्ये कधी कोणाला शिक्षा झाल्याचे अजूनतरी दिसत नाहीत असो बार्शीत मात्र तस होणार नाही एवढीच माफक अपेक्षा.
अजित कांबळे… सामाजिक कार्यकर्ते बार्शी