बार्शी:फळाळवाडी मध्ये चक्क अफूची शेती; 14 लाख किमतीचा अफू जप्त ; तालुका पोलिसांची कारवाई

0
192

बार्शी:फळाळवाडी मध्ये चक्क अफूची शेती; 14 लाख किमतीचा अफू जप्त ; तालुका पोलिसांची कारवाई

बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे तीन शेतकऱ्यांनी शेतामध्ये बेकायदेशीररित्या अफूची लागवड करून देण्याच्या विकण्याच्या उद्देशाने जोपासल्याने सुमारे पंधरा लाखाचा ऐवज जप्त करत तालुका पोलीस स्टेशन मध्ये तीन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल आले आहेत. या घटनेची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांनी तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील फपाळवाडी येथे बेकायदा अफूची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमी दारा मार्फत पोलिसांना समजली, त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अरुण फपाळ यांच्या गट नंबर 27, 28, 29 रामेश्वर फपाळ यांच्या गट नंबर 31,32 तर राज्य भोपाळ यांच्या गट नंबर 46 मध्ये पोलिसांनी छापा टाकला.

यात पोलिसांनी सुमारे 727 किलो अप्पू जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 14 लाख 54 हजार एवढी आहे, यामध्ये वजनाचे ओली वल्ली व ताजी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मानवी मेंदूवर परिणाम करणारा अप्पू सदस्य अमली पदार्थाच्या वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याप्रकरणी रामेश्वर गबरक फळ (वय 42) अशोक धर्मा फपाळ (वय 54) दत्तात्रेय उर्फ राजभाऊ फपाळ (वय 58) तिघेही रा. फपाळवाडी यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या पथकाने केली आहे, या घटनेचा अधिक तपास शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here