सख्ख्या आईचा खून केलेल्या गुन्ह्यातील आरोपी बार्शी पोलिसांनी 24 तासात केला गजाआड.
सख्ख्या आईच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बार्शी पोलिसांनी २४ तासात केला गजाआड
बार्शी/प्रतिनिधी:
१२ ऑक्टोबर रोजी आपल्या आईचा खून करून बार्शी मधून फरार झालेला श्रीराम नागनाथ फावडे (वय २१) वाणी प्लॉट, बार्शी ह्याला रत्नागिरी मधील भाटे खाडी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक डी.डी. उदार यांना गुन्ह्यातील आरोपीला पकडण्या संदर्भात सूचना देऊन दोन-तीन आरोपी शोधण्याकरता रत्नागिरी व मुंबईकडे रवाना झाल्या, तांत्रिक पुरवठ्यानुसार आरोपी श्रीराम नागनाथ फावडे यांना रत्नागिरीजवळील भाटे खाडीजवळ स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यास बार्शी पोलिसांना यश आले आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन त्याचीच कसून चौकशी केली असता मयत रुक्मिणी फावडे या त्याला पैसे देत नव्हत्या व पैशाच्या कारणावरून घरी सतत भांडणे होत होती आरोपीने रागाच्या भरात मयताच्या डोक्यात दगड मारून ठार केले. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिमंत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे त्यांच्या मार्गदर्शनानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस उपनिरीक्षक डी.डी.उदार, शिरसट, वर्पे, वाघमोडे, ठेंगल, पवार, लगदिवे घोंगडे, बारगीर, गोसावी, काळे व जाधव यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे