दारू पिऊन वाहन चालवाल तर होईल कारवाई,दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोघांवर बार्शी पोलिसांची कारवाई.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन मोटर सायकल चालवणाऱ्या वर केली कारवाई; बार्शी शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल

बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहर पोलिसांनी शहरांमध्ये दारू पिऊन वेडीवाकडी मोटर सायकल चालवणाऱ्या दोघांवर कारवाई करून शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी स्टँड चौकामध्ये मोटरसायकलस्वार वेडीवाकडी मोटर सायकल चालवताना दिसला त्यानुसार अक्षय अभिमान कांबळे (वय 22) रा.कातरी जि. उस्मानाबाद त्याच्या ताब्यातील मोटर सायकल एम.एच. 25 ए जि 3961 होता. त्याच्या तोंडाला आंबट व उग्र वास येत होता, पोलिसांनी मोटरसायकल सह ग्रामीण रुग्णालयात तपासणी करता पाठवले असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
दुसऱ्या घटनेमध्ये शहरातील पोस्ट चौकामध्ये महेश वैजिनाथ जाधव (वय 50) रा. हेड्डे गल्ली बार्शी ता. बार्शी याने त्याचाकडील मोटर सायकल एम.एच. 13 डी एच 2582 ही मद्यप्राशन करून चालवीत असताना मिळुन आला. या दोघांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात मोटर अधिनियम 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.