बार्शी! विशाल फटेच्या ऑफिस मधील साहित्य चोरीला ; फटेनी दिली पोलिसात फिर्याद
बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी शहरातील बहुचर्चित आशा कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी विशाल फटे यांच्या उपळाई रोड येथील ऑफिस मधील साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी शहर पोलिसात दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालका कन्सलटंन्ट प्रा.लि. या नावाने शेअर मार्केटचा व्यवसाय आहे. त्याचे ऑफीस हे उपळाई रोड येथिल भगवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वरच्या मजल्यावर आहे. दि.10/01/2022 रोजी दुपारी 01/00 वाचे सुमारास ऑफीस बंद करून त्यास कुलुप लावुन निघुन गेलो होतो. विरूध्द बार्शी शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.27/2022 भा.द.वी.क.420 वगैरे कलमान्वये दि. 13/01/2022 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक बोठे करत आहेत. या गुन्हयात मला दि. 17/01/2022 रोजी अटक झालेली आहे सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे.
सदर गुन्हयाचे तपासकामी मला डि.वाय.एस.पी. बोठे सो आर्थिक गुन्हे शाखा सोलापुर यांनी माझे बार्शी येथिल वर नमुद पत्यावरील विशालका कन्टलटंन्ट सव्हीसेस प्रा.लि. या ऑफीस मध्ये घेवुन आले. सदर ठिकाणी माझे ऑफीसचे मुख्य दरवाज्यास सिल केलेले होते. ते दोन पंचासमक्ष खोलुन आम्ही सर्वजन आत मध्ये गेलो व पाहीले असता शेअर मार्केच्या व्यवसायासाठी मी स्वता घेतलेले सामान व वस्तु हया ऑफीसमध्ये नसल्याचे मला दिसुन आले. सदरच्या वस्तु हया कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझे ऑफीसचे कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन सामान व वस्तु चोरून नेले बाबत माझी खात्री झाली.
विशालका कन्सलटंन्ट प्रा.लि.या माझ्या बंद ऑफीसचे कुलुप कोणीतरी अज्ञात इसमांनी तोडुन ऑफीसमध्ये प्रवेश करुन 1) एक समसंग कंपनीचा एल.ई.डी.टि.व्ही. 2) पाच लिनोओ कंपनीचे संगणकाचे मनिटर्स 3) एक समसंग कंपनीचा काळया रंगाचा कर्व्ह मनिटर, 4) एक चकलेटी रंगाची खुर्ची 5) विशालका कन्टलटंन्ट सर्व्हीसेस व अलका शेअर सर्व्हीसेस या नावाचे एच.डी.एफ.सी.व युनियन बक ऑफ इंडियाचे काही चेक, 6) रोजच्या हिशोबाची चकलटी रंगाची दैनंदिन नोंद वही.असे एकुण 55,000/- रू किंमतीच्या वस्तु संमतीशिवाय कोणीतरी अज्ञात इसामांनी मुद्दाम लबाडीने चोरून नेले आहे.