बार्शीत घरफोडी,दोन लाखांचा ऐवज लंपास –

0
445

बार्शीत घरफोडी,दोन लाखांचा ऐवज लंपास –


बार्शी ; नविन घराचा आतील कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन सोन्याचे दागिणे,रोख रक्कम व मनगटी घड्याळ असा दोन लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार आज सोमवारी सकाळी बार्शीतील बारंगुळे गल्लीत उजेडात आला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मनोज गणपती तुपे वय 30 वर्ष,  रा. बारंगुळे गल्ली कसबा पेठ बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की ते बारंगुळे गल्ली कसबा पेठ बार्शी येथे जुन्या घरामध्ये राहणेस आहे. त्यांनी काळभैरव नगर येथे नविन घराचे बांधकाम केले आहे.

दि. 14/03/2021 रोजी रात्री 09/30 वा. चे सुमारास त्यांचे भाऊजी दत्तात्रय अशोक मांजरे, दत्तात्रय मांजरे यांचे भाऊजी दत्तात्रय खुणे व त्यांची पत्नी वंदना व मुलगी व जावई सर्व रा. इचलकरंजी ता. हातकलंगले जि. कोल्हापुर हे मांजरे देवगाव ता. बार्शी येथे देवकार्य असल्याने ते बारंगुळे गल्ली कसबा पेठ बार्शी येथील जुन्या घरी आले होते.

 
घरी जेवणखान करुन रात्री 10/30 वा.चे सुमारास वरील पाहुणे यांना झोपण्यासाठी काळभैरव नगर बारंगुळे प्लॉट बार्शी येथील नविन घरी सोडले. व ते जुने घरी येवुन झोपले. त्यानंतर आज दि. 15/03/2021 रोजी सकाळी 06/30 वा.चे सुमारास भाऊजी दत्तात्रय मांजरे यांची बहिण वंदना खुणे यांनी फोन करुन सांगतले की, घरी चोरी झाली आहे तुम्ही लवकर या असा फोन आल्याने त्यांनी नविन घरी जावुन पाहीले असता घराचे किचन रुमचा दरवाजाची आतील कडी तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरामधील  भाऊजी दत्तात्रय मांजरे यांची बहिण वंदना खुणे यांचे बँगमधील सोन्याचे गंठण, रोख रक्कम, दोन मनगटी घड्याळे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे.

चोरट्यांनी  1,80,000/-रुपये किंमतीचे 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गळ्यातील गंठण ,रोख रक्कम 25,000/-,दोन मनगटी घड्याळे असा एकुण 2,06,500/-रूपयांचा  ऐवज लंपास केला.बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here