बार्शी – कुर्डुवाडी रस्त्यावर अपघात , बार्शीतील तरुण उद्योजक ठार

0
673

बार्शी – कुर्डुवाडी रस्त्यावर अपघात , बार्शीतील तरुण उद्योजक ठार

बार्शी – कुर्डुवाडी रस्त्यावर शेंद्री फाट्यानाजीक पोकळे वस्तीजवळ आयशर टेम्पो व मोटरसायकलची धडक होवून मोटरसायकलस्वार ठार झाला. विजय बाबुराब घाडगे वय २४ रा बार्शी बायपास रोड, एमआयटी कॉलेज जवळ बार्शी असे अपघातातील मृताचे नाव आहे. दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर बिगर नंबरचा आयशर टेम्पोसह चालक पसार झाला. मृताचा मावसभाऊ सुरेश भारत माने याने दिलेल्या फिर्यादीवरून आयशर टेम्पोच्या अज्ञात चालकाविरोधात बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

विजय घाडगे हा बिगर नंबरच्या केटीएम मोटारसायकलवर कुर्डुवाडीच्या दिशेने जात होता तर आयशर टेम्पो कुर्डुवाडीकडून बार्शीच्या दिशेने येत होता. शेंद्री जवळील पोकळे वस्ती येथे दोन्ही वाहने आल्यानंतर आयशर व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली.यात मोटारसायकलस्वार घाडगे गंभीर जखमी होवून मयत झाला.

तर अपघातानंतर आयशर टेम्पो चालक वाहनसह पसार झाला. रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पो भरदाव वेगात चालवून मोटारसायकल ला धडक देवून घाडगे यास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयशर टेम्पोच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पो कॉ सिरसट करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here