बापरे: रविवारी सोलापूर शहरात पाच मृत्यू तर 106 नवे कोरोना बाधित

0
397

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज रविवारी 339 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 233 अहवाल निगेटिव्ह आले असून 106 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 63 पुरुष तर 43 महिलांचा समावेश होतो .आज 188 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 5 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

आज 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आजपर्यंत  2688 पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 271 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 993 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1424 इतकी समाधानकारक आहे.

रविवारी सोलापुरातील विद्याविहार सोसायटी (उत्तर सदर बझार), राजस्व नगर (बाळे), प्रभा अर्पाटमेंट (होटगी रोड), कोणार्क नगर, गणेश बिल्डर (जुळे सोलापूर), स्वामी विवेकानंद नगरात प्रत्येकी एक, विद्या नगरात दोन तर महर्षि गौतम नगरात दोन, बनशंकरी नगरात एक (शेळगी), कुचन नगर (दाजी पेठ), पश्‍चिम मंगळवार पेठेत सहा रुग्ण सापडले आहेत. तसेच दत्त नगरात दोन (तुळजापूर रोड), शाहीर वस्तीत पाच, मराठा वस्तीत एक (भवानी पेठ), बाल शिवयोगी नगर, पार्वती नगरात प्रत्येकी एक रुग्णांची भर पडली ,Aआहे. बुधले गल्ली, वृंदावन सोसायटी, रेल्वे पोर्टर चाळ, आरटीओ ऑफीसजवळ, देशमुख-पाटील वस्ती व विजय देशमुख नगर, अशोक नगरात प्रत्येकी एक, मुक्‍ती नगरात तीन (विजयपूर रोड), विडी घरकूल, यश नगर, उमा नगरी येथे प्रत्येकी तीन, तुळजाभवानी नगरात पाच (अक्‍कलकोट रोड), सिंधु विहारमध्ये दोन, रुबी नगरात एक (जुळे सोलापूर), नरसिंह नगर, मोदी येथे दोन,

वसंत विहार (जुना पुना नाका), नर्मदा अर्पाटमेंट (रेल्वे लाईन), साई विहार (कुमठा नाका) येथे पाच, ईएसआय हॉस्पिटल येथे दोन, जुनी पोलिस लाईनमध्ये एक (वसंत विहार), आंबेडकर नगररात दोन, लक्ष्मी पेठ व करले गल्ली, पिंजार गल्ली (देगाव) येथे प्रत्येकी दोन, चाटी गल्लीत एक, नई जिंदगीतील सिध्देश्‍वर नगरात एक, अभिषेक नगरात एक, साखर पेठेत सहा,

भारतरत्न इंदिरा नगरात चार, सांगेनगरात दोन (बाळे), न्यू बुधवार पेठेत एक, मजरेवाडीतील टिळक नगरात एक, वैष्णवी नगरात दोन, विशाल नगर, उत्तर सदर बझार, शास्त्री नगर, भवानी पेठ, मुरारजी पेठ, नवी पेठ, शुक्रवार पेठ, इंदिरा नगर, सिध्देश्‍वर पेठ, कविता नगर, न्यू पाच्छा पेठ, विजया नगर, माजी सैनिक नगर, प्रताप नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. 


शहरातील रुग्णसंख्या दोन हजार 688 झाली 

आतापर्यंत एक हजार 648 पुरुष अन्‌ एक हजार 40 महिलांना कोरोनाची लागण 

शहरातील 271 व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये 173 पुरुष तर 98 महिलांचा समावेश 


रविवारी सापडले नवे 106 रुग्ण; 58 वर्षांवरील चौघांचा झाला मृत्यू 

आतापर्यंत 13 हजार 660 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 

शहरातील एक हजार 424 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात; 993 रुग्णांवर उपचार सुरु 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here