बापरे: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सोमवारी आढळले तब्बल 345 कोरोना पॉझिटिव्ह;10 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध गावात व नागरी क्षेत्रात रविवारी उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 345 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 173 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी आज सोमवारी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात 3622 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 345 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 3277 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 345 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 190 पुरुष आणि 155 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5902 झाली आहे.

अक्कलकोट 10 बार्शी 50 करमाळा 31 माढा 16 माळशिरस 52 मंगळवेढा 08 मोहोळ 21 उत्तर सोलापूर 3 पंढरपूर 124 सांगोला 23 दक्षिण सोलापूर 7 असे एकूण 345 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अक्कलकोट येथील दोन ,बार्शी येथील दोन,माढा २ ,माळशिरस 1, पंढरपूर मधील दोन तर सांगोला मधील एक व्यक्ती मरण पावली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 46365
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5902
प्राप्त तपासणी अहवाल : 46241
प्रलंबित तपासणी अहवाल : 124
निगेटिव्ह अहवाल : 40340
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 172
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2397
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 3333
