बापरे  : दोन दिवसात बार्शी तालुक्यात १५३ कोरोना बाधित रुग्ण

0
805

बापरे  : दोन दिवसात बार्शी तालुक्यात १५३ कोरोना बाधित रुग्ण

गृहविलगीकरणात ठेवले २४८ बाधित रुग्ण

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा नव्याने मोठ्या संख्येनी कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत . गेल्या दोन दिवसात  स्वब व अन्टीजन तपासणीत मिळून १५३ बाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर गृहविलगीकरणात २४८ रुग्ण ठेवले आहे .

 बार्शी शहर व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात व्यापारी व कामगारांच्या कोराना तपासणी सुरू आहे .यामध्ये बाधित रुग्ण आढळत आहे. तर सध्या आरोग्य विभागाने गृहविलगीकरणात ठेवलेले बाधित रुग्ण मात्र घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रविवार दि ३० ऑगस्ट रोजी १०१ रुग्ण  तर सोमवार दि ३१ ऑगस्ट रोजी ५२ रुग्ण प्राप्त अहवालात आढळले आहे. यामध्ये शहरातील विविध भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहेत गेली दोन दिवसात १३२० स्वब व अॅन्टीजन टेस्ट अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी १२८६ अहवाल निगेटिव्ह आले आहे. 

१५३ रुग्ण बधित आढळले तर एक रुग्ण मयत झाले तर आजवर तालुक्यात एकुण बाधितांची संख्या २२२४ वर गेली असली तरी यापैकी १७१८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सदया १६८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आजपर्यंत तालुक्यात एकुण मृताचा आकडा ९० वर गेला आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here