मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी ६१ वा वाढदिवस आहे.म्हणजे आयुष्यातील महत्वाचा टप्पा. कोरोनाच्या संकटामुळे कुणीही भेटायला येऊ नये, यंदाचा वाढदिवस डिजिटल पद्धतीने साजरा करा, असं आवाहन अजितदादांनी केलं होतं. त्याला पवार कुटुंबियातील सर्व भगिनींनी मात्र जोरदार प्रतिसाद दिला.

अजित पवारांच्या आठ बहिणींनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे एकत्र येत दादांचा वाढदिवस जोरदार साजरा केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी यात खास पुढाकार घेतला होता.

प्रत्येक बहिणींनी ‘हॅपी बर्थडे टू यू’ असं गाणं गात अजितदादांना शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळें सोबत प्रफुल्ला भोसले, रजनी इंदूलकर,विजया पाटील,निमा माने, निता पाटील, शमा पवार आणि आश्विनी पवार होत्या.या बहिणी सहभागी झाल्या होत्या.दादा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #HBDAjitDada