आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर केमिकल हल्ल्याचा प्रयत्न

0
234

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या अंगावर एका महिलेने केमिकल टाकण्याचा प्रयत्न केला. महिलेसोबतच्या दोघांनी स्वीय सहायकास मारहाण केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी शहरातील भगवंत मैदानाच्या नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे कार्यक्रमस्थळी जात असताना दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

आमदार राजेंद्र राऊत यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत खराडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संजीवनी बारंगुळे, संतोष बारंगुळे, ओमकार पिंपळे (तिघे रा. नागोबाचीवाडी), बालाजी डोईफोडे (रा. उपळाई रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान येथील भगवंत मैदान नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्यासाठी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी उपस्थित राहणार होते. त्यासाठी आमदार राजेंद्र राऊत कार्यक्रमस्थळी येत होते. आमदार राऊत हे कार्यक्रमाला जात असतानाच ‘आमचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्या बांधकाम प्रकल्पाबाबत तक्रारी का करता,’ असे म्हणत बारंगुळे यांनी बाटली उघडून त्यातील केमिकल राऊत यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. विरोध करताना केमिकल जमिनीवर सांडले. संजीवनी बारंगुळे यांच्यासोबत आलेल्या इतर दोन व्यक्ती लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत होते.

त्यावेळी संदेश काकडे, दीपक राऊत, पाचू उघडे, अमोल चव्हाण यांच्यासह इतर लोक येत असल्याचे पाहून ते तिघेजण पळून जात होते. मात्र, पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले. त्याचवेळी एकाच्या खिशातील मोबाईलवर फोन आला. तो फोन दीपक राऊत यांनी उचलला. त्या फोनमध्ये समोरुन मी राजेंद्र मिरगणे बोलतोय, तुम्ही राजा राऊताच्या अंगावर ऍसिड टाकले का नाही? अशी विचारणा केली.

त्यावरुन मिरगणे यांच्या सांगण्यावरुन हा प्रकार घडला असून प्राणघातक हल्ल्याची सुपारी दिली आहे, याची खात्री झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. बार्शीचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार तपास करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here