बार्शी : धार्मिक विधी करायचा नाही का असे विचारल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून चुलता व चुलत भावांनी मारहाण केल्याची घटना वैदू वस्ती, बार्शी येथे घडली.
फिर्यादी हुसेन दुर्गाप्पा धनगर (वय ३५), रा. वैदू वस्ती, परांडा रोड, बार्शी याने, त्याचे घराशेजारीच रहाणारे सख्खे चुलते मारुती मुकींदर धनगर व चुलत भाऊ हुसेन धनगर, मोतीराम धनगर व त्यांचा नातु संज्या हुसेन धनगर हे दि. २५ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाचे सुमारास त्यांच्या घरासमोर बसलेले असताना, त्यांना आपले लक्ष्मी आईस बकरे आहे ते करायचे नाही का असे विचारले असता, चुलते, चुलत भाऊ यांनी त्यास तुझे तू कर म्हणून शिवीगाळी केली.
तो आवाज ऐकून गल्लीतील इतर लोक व आई काठीबाई हे तेथे जमा झाले. तेव्हा बाचाबाची होऊन, मोतीरामने रस्त्यावरचा दगड फेकून मारल्यामुळे कपाळावर लागून रक्त येऊ लागले व फिर्यादी खाली पडला.

आई काठीबाई ही सोडविण्यासाठी आली असता तिला हुसेन यांने घरातून काठी आणून पायावर मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. थोडया वेळात फिर्यादी चक्कर येऊन बेशुध्द पडला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्याच्या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात वरील चौघाविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३२३,३२४,३४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.