गाताचीवाडी येथे महावितरण च्या 33 केव्हीच्या उपकेंद्रास मान्यता-राजेंद्र राऊत

0
184

गाताचीवाडी येथे महावितरण च्या 33 केव्हीच्या उपकेंद्रास मान्यता-राजेंद्र राऊत

बार्शी: तालुक्यातील कांदलगाव, देवगाव, गाडेगाव, व परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. तालुक्यातील गाताचीवाडी येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ३३/११ किलो व्हॅटचे ( KV ) नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाले असल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गाताचीवाडी व या परिसरातील इतर गांवच्या ग्रामस्थांनी आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे नवीन वीज उपकेंद्र उभारणीची मागणी केली होती. या भागातील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने, तेथील शेतकऱ्यांना योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी ग्रामस्थांच्या या मागणीनुसार आमदार राऊत यांनी हे वीज उपकेंद्र मंजूर करण्यासाठी महावितरण कडे सतत पत्र व्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येवून या उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे.

नव्याने उभारण्यात येणारे हे वीज उपकेंद्र सुमारे ४ कोटी रुपयांचे असून, याचा फायदा नव्याने उभारण्यात येणा-या गाताचीवाडी येथील MIDC तसेच गाताचीवाडी, ताडसौंदणे, बेलगांव, मांडेगांव, खडकलगांव, धस पिंपळगाव, शेलगांव व्हळे, देवगांव, कांदलगांव या गावातील शेतकरी बांधवांना होणार आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here