सोलापूर : राज्य सरकारने आज आयएएस श्रेणीत बढती मिळालेल्या 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची बदली झाली असून त्यांच्या जागी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश सायंकाळी प्राप्त झाला.

विभागीय महसूल कार्यालयातील उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप स्वामी यांनी अमरावतीला उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, दर्यापूर, अमरावती येथे उपविभागीय अधिकारी, पुसद आणि त्यानंतर नांदेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले.

त्यानंतर अपर जिल्हाधिकारी म्हणून विमुक्त जाती-जमाती इतर मागास विभागात सहसंचालक, नांदेडला अपर जिल्हाधिकारी त्यानंतर मालेगावला अपर जिल्हाधिकारी, नाशिकला प्रभारी अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.

सध्या विभागीय आयुक्तालयात उपयुक्त होते.
मागील आठवड्यात त्यांचे आयएएस केंडरमध्ये प्रमोशन झाल्यानंतर त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण्यात आले आहे.