आणि दुसऱ्या दिवसापासून ती मुलांमध्ये मुस्कान पेरू लागली !!! चाळीशीतील वावटळ…! अंतिम भाग – 4

0
17470

चाळीशीतील वावटळ…! अंतिम भाग – 4

नवऱ्याशी विश्वासघात आणि तेही केवळ भावनिक शारीरिक सुखासाठी…? किती स्वार्थी आपण,नवर्याने किती जीव लावला आपल्याला कधी मारहाण नाही,शारीरीक कष्टं नाही राणी सारखं ठेवलं आणि आपण हे असं..?? जगण्याचा आता आपल्याला काही अधिकार नाही असं स्वतःला बजावत कपडे सावरत ती किचनकडे वळाली.ओट्यावर पडलेला चाकू उचलून पोटात खूपसणार इतक्यात पंकजने तिचा हात धरला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ए… काय करतेस हे तू ..?? त्याने ओरडत तिच्या हातातला चाकू काढून घेतला. तसं ती हुंदके देत म्हणाली माझ्यासारख्या बाईने हेच करायला हवं..! काय केलंयस तू त्याने हळूवारपणे विचारलं. नैसर्गिक भावनिक शारीरिकओढ प्रेरित बस एका अलवार मिठीने असा काय गुन्हा केला सांग…?? आणी एवढाच जर गुन्हा असेल तर तुझ्याइतकाच मी पण दोषी नाही का? तो म्हणताच, तुझी गोष्ट वेगळीय रे तू लहानेस पण मला कळायला नको का,जीव जातो का हे असं भावनिक शरीर सुखासाठी..? सतत काय हवं असतं या शरीराला. त्या पेक्षा नकोच ते,नष्टच करून टाकावं स्वतःला,सारखीची ससेहोलपट तरी थांबेल एकदाची!


बस्स आता संपवून टाकावं आयुष्यच हुंदके देत ती त्याला सांगू लागली.तसं समजावणीच्या सुरात तो म्हणाला जीव देऊन प्रश्न सुटणारे का..?तुझ्या नंतर तुझ्या मुलाचं आणि नवर्याचं काय होईल याचा विचार केलास का..? पुढच्या वर्षी तुझा मुलगा दहावीला जाईल ना त्याच्या भविष्याचा विचार कर.आणि स्वत:ला का दोष देतेस तू?तुझ्या शरीराच्या मनाच्या मागण्या आहेत त्या नैसर्गिक त्यात तुझा काय दोष!? अजूनही तू नवरा आणि मुलावर तेवढंच प्रेम करतेस ना मग त्यांच्यासाठी तरी तूला जगावंच लागेल!

आणि या शरीरात उसळणाऱ्या आगडोंबाचं काय करू..?? सतत समिधा मागणारं अग्नीहोत्रं झालंय याचं.आज तू होतास उद्या आणखी कोणी आलं तर..?? वेश्येचं जीणं जगावं लागेल मला.त्याला सांगता सांगता तिला भावना अनावर झाल्या होत्या. त्यावर तू एखाद्या गायन्याकला का नाही दाखऊन घेत..? काहीतरी इलाज असेलच की! आणि यावर इलाज सापडे पर्यंत….काय..?? तिने लगेच विचारताच,यावर इलाज सापडेपर्यंत मी येत जाईन तुझ्याकडे पण काही लिमिटेड अटींसह…!

घाबरू नकोस.मी स्वताहून तूला कधीच म्हणणार नाही.पण जेव्हा तुला हा आगडोंब झेलणं अशक्य होईल तेव्हा सांगत जा मला.निदान भावनिक कोलाहल,मनातली वावटळ तरी शमवायचा प्रयत्न करेल मी.स्वतःला अपराधी मात्र समजू नकोस.या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा हाच एक मार्ग आहे!पंकज समजावणीच्या सुरात तिला सांगू लागला.तिला यावर काय बोलावं सूचेनाच.इतक्यात तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं.रोहीत यायची वेळ झाली होती.

आज त्याची ट्युशन उशीरा सुटणार होती.घाई घाई सगळं आवरत ती पंकजला म्हणाली आधी तू निघ इथून रोहीत यायची वेळ झालीये.उद्या क्लासला मी येईल तेव्हा बोलू या.आणि डोन्टवरी मी जीवाचं काहीही करणार नाही.माझ्या मुलासाठी, नवऱ्यासाठी मला जगावंच लागेल.पंकजही मग तिला धीर देत तिथून लगेच काढता पाय घेतो.

तो गेल्यावर सुन्न मनाने तिने सगळं घर आवरलं.
दोनदा अंघोळ केली.एक प्रकारचा बधीरपणा आला होता तीला.काय करावं सूचत नव्हतं.रोहीतला कसं तोंड द्यावं याचा प्रश्न पडला होता.कशीबशी खिचडी टाकून तिने पडून घेतलं.त्या दिवशी ती कोणाशीही काहीच बोलली नाही.बरं वाटत नाहीये असं सांगून पडून राहीली.राकेशला सामोरं जाणं तर नकोच वाटत होतं तिला. इतक्या वर्षांचा संसार,या माणसाचा विश्वासघातच केला की आपण! काही कमी पडू दिलं नाही आपल्याला आणि आपण हे असं! दूसऱ्या दिवशीही दिवसभर ती सारखसारखं हाच विचार करत होती.मग दुपारी सगळं आवरून ती क्लासला गेली.

तिची नजर पंकजला शोधत होती,एवढ्यात तो बाईकवरून येताना दिसला.आई गं…अजूनही याला बघून काळजात कळ का उठते! याचं काही तिला उत्तर सापडत नव्हते.क्लासनंतर पंकजशी भेटायचं ठरवून ती कशीबशी कामाला लागली.तिचं कूठंच लक्ष लागत नव्हतं.कधी क्लास संपतो आणि पंकजला भेटते असं तिला झालं होतं.

एकदाचा क्लास संपवून दोघं कॉफीशॉप मधे भेटले.काय बोलावं दोघांनाही सूचेना.त्याने एक विजीटींग कार्ड तिच्याकडे दिलं.या सीटीतल्या नंबर वन गायन्याक आहेत.त्यांची appointment घेतलीय तू त्यांना उद्या भेट.मला खात्रीय त्या काहीतरी मार्ग नक्कीच सूचवतील तो तिला सांगू लागला तसं ती म्हणली की मी आधीच एका गायन्याकला दाखवलेलं यामागे पण त्यांनाही काही डायग्नोस झालं नाही.तरीही नक्कीच यांना भेटून बघते खूप मोठं नाव आहे यांचं असं म्हणत बाकी फारसं न बोलता ती निघून गेली.

दुसऱ्या दिवशी ती त्या गायन्याक डॉक्टरला भेटली. तिथं काय होतंय..? या प्रश्नाला काय उत्तर द्यावं तेच तिला सूचेना.तरीही तिला जमेल तसं मोडक्या तोडक्या शब्दात तिने तिला(गायन्याकला) काय होतंय ते सांगितलं.एक सुस्कारा सोडून त्या म्हणाल्या की होतं काही बायकांना असं हार्मोनल इम्बॅलन्समुळे!विशेषत:चाळीशी पंचेचाळीशीनंतर…Mid life crisis..!! अचानकच सेक्सची भावना वाढते.तोचतोचपणाचा कंटाळा आणी नाविन्यपूर्ण अनुभवण्याची उत्सुकता!

Excitement you know. त्याला ट्रीटमेंटही आहे.पण ती बर्यापैकी वेळखाऊ आहे.तुम्हाला वेट करावा लागेल यासाठी.त्यावर सरिताने सांगितले की मला लगेच ही ट्रीटमेंट चालू करा वेळखाऊ असली तरी चालेल पण मला यातून बाहेर पडायचंय! तेव्हापासून तिने उपचार चालू केले.पण तरीही बरेचदा तिचं शरीर बंड करून ऊठतच असे,तोच आगजाळ तिच ससेहोलपट!

तीने कटाक्षाने पंकजपासून लांब रहायचं ठरवलं.
कितीही आठवण आली,त्रास झालातरी.अनेकदा नकोनको होई तिला.आगआग होई शरीराची
त्यातही ती एकटी असतांना,नको नको होई तिला!!

एकेदिवशी परत तसाच जीवघेणा पाऊस कोसळायला लागला आणि खिडकीतून तो बेहोश कोसळणारा पाऊस पाहून तिला पंकजची खूप आठवण येऊ लागली.काय करावं तिला सूचेना.त्याचा परफ्युम त्याचं जीवघेणं स्माईल..त्याचं बोलणं,एवढ्या कमीवयात एवढा समंजसपणा,आणी त्याची ती मिठी…क्षणाक्षणाला तिची तगमग वाढत होती.एक मन म्हणत होतं की भावनेच्या भरात वाहू नकोस,तर एक मन म्हणत होतं बोलव की त्याला..हाच एकमेव पर्याय आहे.अश्यात मन कूठंतरी गुंतवावं म्हणून तिने टीव्ही लावला तर तेच डिंपल आणि रूषी कपुरचं sensational song लागलेलं- जाने दो नाsss…! हेय पास आओ नाsss…छुओ ना छुओ ना मुझेsss…!!

आता तर तिला पंकजची अनावर आठवण आली आणि तिच्याही नकळत तिने लगेच त्याला फोन लावला.तो नाही म्हणणं शक्यच नव्हतं!तिचं सगळं ऐकून घेतल्यावर त्याने सांगितलं की पाचवाजल्यापासून तो मोकळाच आहे, पण मी येणार नाही तर तू यायचंस माझ्याबरोबर बाहेर. मी घ्यायला येईल तुला फक्त. ती विचार करत होती एवढ्या भरपावसात कूठे नेणार हा आपल्याला.तिने लटकंच होकार देत फोन ठेवला.

तिने मग रोहीतला परस्परच ट्युशन वरून मित्राकडे जायला सांगीतलं आणि पंकजची वाट बघत बसली.ठरल्यावेळी तो येतांना जसा दिसला तसं ती पटकन् घराला कुलूप लावून बाहेर पडली. बाईकवर तो जास्तच हँडसम दिसत होता.तिने त्याच्याजवळ जाताच पहिलं विचारलं – कूठे चाललोय आपण पंकज?माझ्याकडे वेळ नाहीये जास्त आणि घरीच भेटलो असतो ना आपण…हे असं का?? त्यावर तो म्हणाला काळजी करू नकोस जवळच जात आहोत लवकर सोडेल मी तूला.तसं ती बाइकवर बसली.त्याने ती पाठीमागे बाइकवर बसताच बाईक जोरात घेतली.

तिची तगमग वाढतच होती,या रिमझिम पावसात कधी हा रस्ता संपतोय असं तीला झालेलं.साधारण दहाऐक मिनीटांनंतर त्याची बाईक एका छोटेखानी ऑफीससमोर थांबली.त्याने तिला खुणावताच दोघंही समोर ऑफीसात शिरली.

साधसंच ऑफीस एक केबिन दोन खुर्चा एक टेबल बस्स.टेबलामागे भिंतीवर “मुस्कान”असं ठळकमोठ्या अक्षरात लिहीलेलं आणि बाजूला काही लहान मुलांचे खुप सुंदर फोटो होते!तिला काहीच संदर्भ लागेना की आपण नेमकं कुठे आलोय,कशासाठी आलोय.

एवढ्यातच एक पंकजच्याच वयाचा तरूण आत आला.खूप उत्साही दिसत होता हावभाववरुन. त्याने पंकजशी शेक हॅन्ड केले. कसं चालूय काम..? पकजने विचारताच त्याने सांगितलं की खूप छान सुरूय पण माणसं नाहीत रे! लोकं पैसा देतात इथे पण वेळ देत नाहीत रे.वेळच महाग झालीये! रोज मुलांची भर पडतेय, मुलांना शिकवायला हवं ना कोणीतरी आता..! त्यावर लगेच त्याच्या पाठीवर हात ठेवत प्रसन्न मुद्रेत पंकज त्याला समजावणीच्या सुरात सांगतो की ती काळजी सोड तू आता…! हे बघ या सरिता मॅडम आहेत. या येत जातील इकडे काही वेळ मुलांसाठी!

सरीताला काहीच कळेना काय चाललंय हे! त्याचा मित्र गेल्यावर तिने विचारलं की हे काय चाललंय?? त्यावर पंकजने सांगितलं की हा माझा मित्र आशीष चांगला शिकलेला,सुखवस्तु घरातला.तो एक छोटीशी NGO चालवतो.

वेश्यांच्या मुलांसाठी.वेश्यावस्तीत राहून राहून या लहान मुलांच्या संवेदना बधीर होतात. नको त्या वयात नको ते बघावं लागत असल्याने त्यांचं बालपण संपून जातं.संस्कार तर दूरच पण साधं नॉर्मल आयुष्यही त्यांच्या वाटेला येत नाही.त्यांना आपला बाप कोण काय हे तर माहीत नसतंच पण आईही पुरेसा वेळ देऊ शकत नाही. मुलींचे तर जास्तच हाल. दुर्दैवाने पुढे जाऊन त्यांनाही या नरकयातनाच भोगाव्या लागतात.

अनेक आयांची अशी इच्छा असते की आपण जे भोगलं ते आपल्या मुलांनी भोगू नये.पण काय करणार! समाजात अशा मुलांना स्थानच नाहिये अजुनही! कोण काळजी घेणार त्यांची म्हणून ही छोटीशी NGO! मी पण आशीषला होईल तशी मदत करतो.माझी अशी इच्छा आहे की जेव्हा जेव्हा तू तुझ्या शरीराच्या, मनाच्या वावटळीत अडकशील तेव्हा तेव्हा मला आणि “मुस्कान” ला आठवत जा! आणि तडक इकडे येत जा बस्सकाही वेळ इथे मुलांना देत जा एवढंच! ही मुलंपण वावटळीतच सापडलीत गं! तु तरी ट्रीटमेंटनंतर बाहेर पडशील यातून पण या मुलांचं काय..?

8
म्हणून म्हणतोय सैरभैर झालेलं तुझं मन इकडे लाव काही वेळ.नक्कीच या मुलांच्या चेहऱ्यावरील मुस्कान तुला बळ देतील!

सरिता पंकजचं हे न पाहिलेलं रूप अवाक होत पाहतच राहिली आणी तिलाही त्याच बोलणं मनोमन पटलं.तिने ताबडतोब मनावरील सगळा मळभ दूरसारुन स्मितहास्य करत होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून ती मुलांमध्ये मुस्कान पेरू लागली!!

समाप्त!

प्रसाद????

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here