RSS च्या बार्शी तालुका संघचालकपदी आनंद सोमाणी
बार्शी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बार्शी तालुका संघचालकपदी बार्शीतील उद्योजक आनंद नंदकिशोर सोमाणाी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़. पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे यांनी सोमाणी यांची नियुक्ती केली.


याप्रसंगी जिल्हा प्रचारक सुशांत पांडकर,जिल्हा सहकार्यवाह किरण सुतार, तालुका कार्यवाह मोहन शिरामे व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुर्वीचे संघचालक विग़ो बंडेवार यांचे निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते. सोमाणी हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा