बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे वृद्धास मारहाण -तिघांवर गुन्हा दाखल

0
418

बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे वृद्धास मारहाण -तिघांवर गुन्हा दाखल


बार्शी ;

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शेळीचे पिल्लू शेतात गेल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून एका वृद्धास शिविगाळ करत लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील कुसळंब शिवारात घडला.

#बिभीषन सोपान शिंदे, सविता बिभीषन शिंदे  व सुरज बिभीषण शिंदे तिघेही रा.कुसळंब, ता.बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#नानासाहेब भाऊराव शिंदे वय62वर्षे,  रा.कुसळंब, ता.बार्शी, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सकाळी 10:00वा. चे सुमारास ते शेळ्या चारायला त्यांची शेती गट नं.107/1/अ मध्ये गेले होते. शेळ्या चारत चारत ते शेतातील कडबा गोळा करत होते. त्यांच्या शेताच्या शेजारीच भावकीतील बिभीषन सोपान शिंदे यांचे शेत असून ते त्यांच्या पत्नी सविता व मुलगा सुरज यांचेसह शेतातच होते.

सायं.05:00वा. चे सुमारास फिर्यादीचे शेळीचे एक पिल्लू त्यांचे शेतात गेले म्हणून त्यांनी पटकन जावून ते पिल्लू परत  शेतात आणले व ते पुन्हा  शेतातील काम करू लागले. त्यावेळी बिभीषन शिंदे यांची पत्नी सविता फिर्यादीकडे त्यांच्या शेतात आली व  शिवीगाळी करत म्हणाली की तू तुझ्या शेळीच पिल्लू आमच्या शेतात का लावलं. त्यावर फिर्यादी तिला म्हणाले की मी ते पिल्लू तुमच्या शेतात लावल नाही ते चुकून तिकडे आल होतं.

त्याने तुमच्या शेतातील खावून जे काही नुकसान केल आहे ते मी भरून देतो उगाच शिवीगाळी करू नका. त्यावर ती तिचा मुलगा सुरज यास म्हणाली की त्याला जावून बघ त्याने आपल्या शेतात शेळीच पिल्लू का लावल आहे. त्याचं लय वेळा झालं आहे अस करायचं, त्याला सोडू नकोस. त्यावर सुरज हा त्यांचे शेतातील लोखंडी पाईप घेवून येवून शिवीगाळी करत आला. पोटावर, पाठीवर, उजव्या हातावर, डाव्या हाताच्या दंडावर, डाव्या पायावर मारहान करण्यास सुरूवात केली.

त्याच वेळी बिभीषन शिंदे व सविता शिंदे हे त्याला सोडू नको त्याला आणखी मार, त्याचं हे नेहमीचच आहे, त्याला चांगला चोप दे असे म्हणून मला शिविगाळी करत होते. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here