बार्शीत सोमवारी 61 कोरोना रुग्णांची वाढ; गृहविलगीकरणात ५०८ रुग्ण तर २०७ रुग्णांवर उपचार सुरु
बार्शी : गेल्या काही दिवसापासुन बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असुन यामुळे सदयस्थितीत गृहविलगीकरणात ५०८ रुग्ण तर २०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आज सोमवार दि ७ ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात ६१ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.


बार्शी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अँन्टीजन रॅपीड तपासणी होत असल्याने रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. जे रुग्ण कोरोना बाधित आहेत मात्र लक्षणं दिसत नाहीत असे ५०८ रुग्ण गृहविलगीकरणार ठेवले आहे . तर २०७ रुग्णांवर शहरातील विविध हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु आहेत.
यामध्ये शहरात सध्या ३६७ रुग्ण तर ग्रामिणमध्ये १४१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत त्यामुळे नागरीकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. बार्शी तालुक्यात आजवर २८५४ कोरोना बाधीतांची संख्या झाली यापैकी २०४० रुग्ण बरे झाले आहेत तर आजवर ९९ रुग्ण दगावले आहेत.
