बार्शीत 53 कोरोना रुग्णांची वाढ; एकुण संख्या पोहचली – ५८७, आत्तापर्यंत मयत २०
बार्शी तालुक्याच्या मंगळवार दि. २१ रोजी आलेल्या अहवालात ५३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने नागरिकांच्या चिंता वाढली आहे.आता कोरोना रुग्ण संख्या ५८७ वर गेली आहे.

बार्शी तालुक्यात गेली काही दिवसात सातत्याने कोरोना रुग्णांची झापाट्याने वाढ होत आहे. रोज येणारी आकडेवारी बार्शीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे आज बार्शी तालुका वैदयकीय अधिकारी संतोष जोगदंड यांनी दिलेल्या माहिती नुसार बार्शी शहरात १६ पॉझिटिव्ह रुग्ण तर ग्रामिण मध्ये ३७ रुग्ण वाढून आता कोरोना बाधितांची संख्या ५८७ वर पोहचली आहे .
तर बार्शी शहरात २८७ रुग्ण संख्या आहे तर यापैकी २३२ रूग्णावर उपचार सुरु आहेत . ५२ रुग्ण बरे झाले आहेत तर ६ रुग्ण मयत झाले आहे.


ग्रामिण मध्ये २९७ रुग्ण संख्या असुन यापैकी २२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत यातील ६० रुग्ण बरे झाले आहे तर ग्रामिण मध्ये आता पर्यंत १६ व्यक्ती मयत झाले आहेत .
यामुळे बार्शी तालुक्यात बाधित रुग्णाची संख्या ५८७ असून यापैकी ४५५ जणांवर उपचार सुरु आहेत . ११२ जणांवर उपचार करुन घरी पाठवले आहे तर तालुक्यात आजवर २० जण मयत झाले आहे .

बार्शी तालुक्यात कंटेनमेंट झोन च्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असुन १२३ कंटेनमेंट झोन असुन यापैकी १०० झोन सुरु असुन २३ झोनने कालावधी पुर्ण केलेला आहे . बार्शी शहरात सध्या ७० तर ग्रामिण मध्ये ३० कंटेनमेट झोन आहेत .
बार्शी शहर व तालुक्यात वाढता कोरोनाचा संसर्ग पाहाता प्रशासनाने समन्वय साधून सर्वोतोपरी उपाययोजना करून वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालावा अशी मागणी नागरीकांतुन होत आहे .
