उस्मानाबाद जिल्ह्यात आज मंगळवार 14 जुलै रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण 33 जणांना कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४१८ झाली असून त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला असून २५० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल आहे. तर १५१ कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेल्या स्वॅब तपासणी अहवालात तेरा रुग्णा बाधित असल्याचे समोर आल आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तिघेजण इतर जिल्ह्यात उपचारादरम्यान बाधीत असल्याच निष्पन्न झाल आहे. उस्मानाबाद इथं जिल्हा शासकीय रुग्णालयास प्राप्त झालेल्या रॅपिड एंटीजन टेस्ट किट च्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणीत 17 जण कोरोना बाधित आढळले आहेत.

तेरा जणांमध्ये उस्मानाबाद शहरातील सात , वाशी तालुक्यातील तेरखेडा इथला एक , पार्डी इथले दोन , तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील दोन तुळजापूर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या उस्मानाबाद , भूम , परंडा तालुक्यातील तीन रुग्णांचा ही यात समावेश आहे.
उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात घेतलेल्या रॅपिड एंटीजन टेस्ट किट च्या माध्यमातून केलेल्या तपासणीत जिल्हा कारागृहातील सहा कर्मचारी आणि 11 कारागृह बंदी यांना कोरोना चा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल आहे.