बार्शी तालुक्यात बुधवारी रात्री १८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ; एकुण संख्या पोहचली – ८२० वर
बार्शी : गणेश भोळे
बार्शी तालुक्यात बुधवार दि २९ रोजी आलेल्या अहवालात १८ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे . यामुळे तालुक्यातील कोरोनाचा आकडा ८२० वर गेला आहे .

सोलापूर जिल्ह्यात सर्वात गतीने कोरोनाबाधित रुग्ण वाढीची संख्या बार्शी तालुक्यात आहे. लॉकडाऊन काळातही रुग्णांची वाढ सुरुच आहे . या लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात रुग्ण वाढीची साकळी तुटण्यास मदत होत आहे. मात्र लॉकडाऊन संपण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाही रुग्ण वाढ होत आहे .

आज आलेल्या अहवालात सन्मित्र हौउसिंग सोसायटी – ४ रुग्ण, भवानी पेठ -१ रुग्ण दाणे गल्ली २ घोडके प्लॉट -१ मांगडे चाळ १ मंगळवार पेठ १ मनगिरे मळा १ सुभाष नगर -२ टिळक चौक १ असे १४ कोरोना बाधित रुग्ण शहरात आढळले तर ग्रामिण भागात वैराग २,

रातंजण – १, उपळे दु -१, असे चार रुग्ण सापडल्याने ग्रामिण व शहरात मिळुन १८ रुग्णाची वाढ होवून ना आता तालुक्यातील कोरोना बाधिताचा एकुण आकडा ८२० वर पोहचला आहे . मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे .
साडेचारशे हुन अधिक रुग्ण बरे झाले आहे . तर आता पर्यंत ३० रुग्ण मयत झाले आहे या मयताच्या संख्येत वयोवृद्ध व्यक्ती दगवण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कोरोना पासुन बचावण्यासाठी वयोवृद्ध तसेच पहिल्यापासुन इतर आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे .
