बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी अमिता दगडे पाटील ; शिवाजी गवळी यांची झाली बदली
नगरपालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा केला संकल्प
बार्शी: बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सोलापूर स्मार्ट सिटी च्या सीईओ म्हणून काम पाहिलेल्या अनुभवी अमिता दगडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदली होताच त्यांनी तात्काळ गवळी यांच्याकडून पदभार ही घेतला आहे. बार्शी शहरात कोविड नियंत्रणात आणणे आणि पालिकेला आर्थिक शिस्त लावणे याला आपले प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

बार्शी शहर तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव हा वाढत चालला असून त्या अनुषंगाने तहसीलदार प्रदीप शेलार यांनी पदमुक्त करत कुंभार यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. त्यानंतर गवळी यांची ही बदली होणार अशी चर्चा होती व ती खरी ठरली.शहरात रखडलेली विकास कामे मार्गी लावणे, कोरोना नियंत्रणात आणणे व स्वच्छता या कामाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

अमिता दगडे या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी सोलापूर महापालिका सहा. आयुक्त, तसेच सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ म्हणून काम केले आहे. नव्हे तर त्यांच्या च काळात हा प्रस्ताव तयार तयार करण्यात आला होता.व प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली होती.

त्यांनी यापूर्वी पाचगणी, महाबळेश्वर, जयसिंगपूर, मंगळवेढा कराड आदी नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.2018 ला त्या पाचगणी ला मुख्याधिकारी असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पहिला क्रमांक आला होता. तर 2019 मध्ये महाबळेश्वर देशात आठवे आणि पाचगणी देशात तेरावे आले होते.
सोबत फोटो आहे