“मी मुर्ख आहे का ? मी डॉक्टर आहे, मी पीएचडी होल्डर आहे; हाफकिन प्रकरणावर तानाजी सावंत भडकले

0
52

“मी मुर्ख आहे का ? मी डॉक्टर आहे, मी पीएचडी होल्डर आहे; हाफकिन प्रकरणावर तानाजी सावंत भडकले

मी डॉक्टर आहे, मला मुद्दाम टार्गेट केलं जातंय, हाफकिन प्रकरणावर तानाजी सावंत यांचं उत्तर

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरु आहे. आरोग्यमंत्री ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायचा बंद करा असा आदेश दिला. त्यावेळी त्यांच्या पीएकडून त्यांना हाफकिन ही संस्था असल्याचे सांगितले. मंत्र्यांनी तिथून पळ काढला अशी अशी बातमी छापून आली आहे. त्यावर आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छापून आलेली बातमी सोशल मीडियावर चांगली व्हायरल झाल्याने सावंत यांच्यावरती टीका होत आहे.

तानाजी सावंत संतापले

“मी मुर्ख आहे का ? मी डॉक्टर आहे. मी पिएचडी होल्डर आहे तसेच रॅकर आहे. आयुष्यभर घासलेलं आहे. मीडिया मुद्दाम टार्गेट करुन दाखवत आहे. जनतेची दिशाभूल केली जात आहे” असं तानाजी सावंत यांनी सांगितलं.

हापकिन कोण आहेत हे मला माहिती नसल्याचे मीडियाने दाखवले. मी ग्रामीण भागातील आहे. मी जर एखादी गोष्ट ग्रामीण भागातील म्हणालो, तर मीडिया माझ्या मागे फिरणार नाही. विशेष म्हणजे अशा गोष्टींसाठी पेनाला टोपन लावत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here