बुधवारपासून सोलापूर शहर परिसरामध्ये सम-विषम शिवाय शहरातील सर्व बाजारपेठा सोमवार ते शनिवार दरम्यान खुल्या राहतील असा सुधारित आदेश पालिका आयुक्त श्री पी. शिवशंकर यांनी काढला आहे.
सोलापूर– मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर शहर परिसरातील सर्वच बाजारपेठा खुल्या कराव्यात अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स व काही व्यापाऱ्यांनी महापौरांकडे करण्यात आली होती. त्याअनुषंगाने महापौरांनी पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून पुढील आदेश करण्यासंबंधीचे सूचना दिल्या होत्या त्यानुसार पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर श्रीकांचना यन्नम आदींच्या सूचनेचा विचार करून पालिका आयुक्त यांनी बाजारपेठ रविवारचा दिवस वगळून शहरातील बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिल्याने व्यापारातून समाधान व्यक्त केले जात असल्याची प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन राजू राठी यांनी व्यक्त केले.

व्यापार करीत असताना सर्वसामान्य नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करून सोलापूर शहर हे पूर्ण कोरोनामुक्त करण्याचे आव्हान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी केले.सोलापूर शहर परिसरामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून शहरातील बाजारपेठेवर दैनंदिन व्यवहार करण्याकरता काही निर्बंध लागू करण्यात आले होते 30 जून रोजी लागू करण्यात आलेल्या निर्बंधमध्ये सम-विषम या नियमाच्या अधीन राहून दैनंदिन बाजार व्यवहार करण्याकरता बाजारपेठ त्यांना मुभा देण्यात आली होती.

त्यामध्ये सुधारित असा बदल करत
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे बाजार बाजारपेठ क्षेत्रातील दोन्ही बाजूचे दुकाने सोमवार ते शनिवारी सकाळी 9:00 ते सायंकाळी 7:00 पर्यत चालू राहतील व रविवारी बंद राहतील सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील डेअरी, दूध विक्री करणारे दुकाने रविवारी व अन्य दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7:00 या वेळेत चालू राहतील.

तसेच अत्यावश्यक सेवा देणारे उपक्रम यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे चालू राहतील तसेच सलून व केश कर्तनालय,मटन विक्रीचे दुकाने व होम डिलिव्हरी देणारे हॉटेल, किचन यांची सेवा यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे रविवारी चालू राहतील अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.नियमाचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे जे कोणी नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा आदेश देखील पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी यावेळी दिला.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर याचं आभार मानले यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, सोलापुर चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष राजू राठी,सचिव धवल शहा,खजिनदार निलेश पटेल,संचालक चेतन बाफना,शैलेश बचुवार आदी मान्यवर उपस्थित.