कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या स्मरणार्थ अक्कलकोटे परिवार देणार 17 वा पुठ्ठा गणेश मंडळास कार्डीयाक अॅम्बुलन्स……!
बार्शी – कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधुन अक्कलकोटे परिवाराच्या वतीने टाटा विंगर कंपनीची कार्डीयाक अॅम्बुलन्स समारंभ पुर्वक लोकार्पण मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजीत करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी दिली आहे.

माजी नगरसेविका श्रीमती सुशिला अक्कलकोटे यांचे पती व विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांचे वडील हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचीत्य साधुन अक्कलकोटे परिवाराच्या वतीने श्री गणपती मंदिर देवस्थान १७ वा पुठ्ठा रोडगा रस्ता, बार्शी या नोंदणीकृत व पौराणीक पार्श्वभूमी असलेल्या ट्रस्टला कार्डीयाक अॅम्बुलन्स देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, ह.भ.प.डॉ. जयवंत बोधले यांच्या शुभहस्ते २१ सप्टेंबर २०११ रोजी सायं. ६ वा. तेलगिरणी चौक, बार्शी या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रांताधिकारी हेमंत निकम, पोलीस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर, महाहौसींगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, तहसिलदार सुनील शेरखाने, पोलीस निरिक्षक रामदास शेळके, श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, नगरपरिषद मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, आयएमए अध्यक्ष डॉ. प्रशांत मोहिरे, कोविडयोद्धा डॉ. संजय अंधारे, मराठा एकता मंडळाचे अध्यक्ष डॉ. भरत गायकवाड, माजी नगराध्यक्ष मंगल शेळवणे, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, माजी नगराध्यक्ष दगडू मांगडे, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, माजी नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ रसाळ, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, माजी उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, माजी उपनगराध्यक्ष अरुणा परांजपे, माजी उपनगराध्यक्ष माया माने, माजी उपनगराध्यक्ष संदिप बारंगुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.
सदर कार्डीयाक अॅम्बुलन्स मध्ये व्हेंटिलेटर सह सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा असणार आहेत. अक्कलकोटे परिवाराच्या वतीने श्री गणपती मंदिर देवस्थान १७ वा पुडा रोडगा रस्ता, बार्शी या ट्रस्टला सदर अॅम्बुलन्स देण्यात येणार आहे. यामुळे बार्शी व परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह अॅम्बुलन्सची भर पडत आहे. तरी कोरोना नियमांचे पालन करुन होत असलेल्या या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन अक्कलकोटे परिवाराने केली आहे.
या वेळी माजी नगरसेविका सुशिला अक्कलकोटे, श्री गणपती मंदिर देवस्थान १७ वा पुट्टा ट्रस्टचे सदस्य माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके, गणेश अक्कलकोटे, चंद्रकांत अक्कलकोटे, महेश अक्कलकोटे, उमेश अक्कलकोटे, प्रशांत अक्कलकोटे, श्रीकांत अक्कलकोटे ट्रस्टचे बाळासाहेब श्रीश्रीमाळ, किशोर ढोले उपस्थित होते.