पंढरपूरकरांना अ‍ॅड. सारंग आराध्येंनी दिली हाय फ्लो ऑक्सिजन मशीन भेट

0
527

पंढरपूर– मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे पंढरपूरचे सुपूत्र अ‍ॅड. सारंग आराध्ये यांनी कोरोनाकाळात पंढरपूरमधील नागरिकांच्या सोयीसाठी जवळपास 3 लाख 87 हजार रूपये किंंमतीचे हाय फ्लो नसल ऑक्सिजन मशीन स्वखर्चाने उपलब्ध करून दिले असून ते येथील अ‍ॅपेक्स रूग्णालयात बसविण्यात आले आहे. यापूर्वी येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने तीन मशीन देण्यात आल्या आहेत.

दरम्यान अ‍ॅड. आराध्ये यांच्या या उपक्रमाचे पंढरपूरमधून स्वागत होत आहे. मंगळवार 11 ऑगस्ट रोजी हे मशीन महावीर नगर येथील अ‍ॅपेक्स या मध्यवर्ती रूग्णालयात बसविण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, अ‍ॅड. सारंग आराध्ये, सतीश आराध्ये, डॉ.आरिफ बोहरी, डॉ. प्रविदत्त वांगीकर, डॉ. अभिजित माचणूरकर, डॉ. संदीप गवळी, डॉ. मंदार सोनवणे, डॉ. करण व्होरा, अनिरुद्ध बडवे, मंदार केसकर उपस्थित होते.

या श्‍वासाच्या समस्येवर हे मशीन उपयुक्त असून सध्या कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. या आजारासाठी खुल्या असणार्‍या रुग्णालयात हाय फ्लो नसल ऑक्सिजन मशीनची कमतरता आहे. सध्या दवाखान्यात उपलब्ध सामान्य ऑक्सिजन मशीन प्रति मिनिट 8-10 लीटर ऑक्सिजन रुग्णास पुरवते.

मात्र हे हाय फ्लो मशीनची 60-65 लीटर ऑक्सिजन सोडण्याची क्षमता आहे. यासाठी कोविड काळात हे मशीन रूग्णांसाठी वरदान ठरणार आहे. अ‍ॅड. सारंग आराध्ये यांनी त्यांचे मित्र डॉ. प्रविदत्त वांगीकर यांच्याशी चर्चा करून हे मशीन पंढरपूर शहर व तालुक्यातील रूग्णांसाठी स्वखर्चाने देवू केले आहे.

मंदिरे समितीच्या वतीने तीन अशी मशीन उपलब्ध झाली आहेत तसेच शहरातील अन्य दोन खासगी रूग्णालयात प्रत्येक एक मशीन तेथे आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here