तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे बार्शी तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार ; डी एस कुंभार महिनाभरात कंटाळले
बार्शी : बार्शीचे प्रभारी तहसीलदार डी एस कुंभार यांच्याकडे दिलेला बार्शीचा पदभार एक महिन्यात काढून घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेतील तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे बार्शीच्या तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. शनिवारी त्यांनी तहसीलदार डी एस कुंभार यांच्याकडून पदभार घेतला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत गत महिन्यात सोलापूर येथे झालेल्या कोरोना विषयक आढावा बैठकीत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील कोरोनाविषयक कामकाजाविषयी असमाधान व्यक्त करत तक्रारी केल्या होत्या.
त्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाल होऊन विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र पाठवून बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांच्याकडील पदभार तात्काळ काढून घेवून अन्य अधिकारी यांच्याकडे देवून प्रशासकीय व कोरोना विषयक कामकाज प्राधान्य क्रमाने करण्यात यावे असे निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेतील तहसीलदार डी एस कुंभार यांच्याकडे येथील अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.

बापरे पुनः काळजी वाढली: बार्शी तालुक्यात शनिवारी 83 कोरोना बाधित रुग्ण सापडले; एकूण आकडा 2071
तहसीलदार कुंभार यांनी डेप्युटी इंसिडेंट कमांडर म्हणून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. तहसीलदार कुंभार यांच्याकडे जिल्हा निवडणूक शाखेचा मूळ पदभार आहे. तेथील कामाचा व्याप अधिक आहे. त्या कामाच्या व्यापामुळे ते बार्शीला अधिक वेळ देवू शकत नव्हते.
सोलापूर जिल्हा मोबाईल असो. जिल्हाध्यक्षपदी धीरज कुंकुलोळ,सचिवपदी शशिकांत सादिगले
त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी यांना याबाबत अवगत केले होते. त्यानंतर आज तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे बार्शीच्या तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला.जमदाडे हे मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील रहिवासी असून तरुण असलेले किरण जमदाडे कामाच्या बाबतीत प्रॉम्प्ट आहेत.