राजकारण व समाजकारणातिल अग्रगण्य नाव ॲड.रणवीर राजेंद्र राऊत…

0
115

राजकारण व समाजकारणातिल अग्रगण्य नाव ॲड.रणवीर राजेंद्र राऊत…

राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या बेधडक आक्रमक कार्यक्षम असणारे,लोकहिताचे निर्णय,जनसंपर्क आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चारित्र्यसंपन्न युवा नेतृत्व म्हणजे रणवीर भैया म्हणून हा लेख प्रपंच करीत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आमदार राजाभाऊ राऊत यांचा राजकिय वारसा असला तरी स्वतःच्या कर्तुत्वाच्या जोरावर राजकारणात वेगळा ठसा उमटविला आहे.अगदी कमी वयात कॉलेज जीवनात विविध पदे भुषवत सोबतच सामाजिक भान राखत,स्वतःच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.परिस्थिती कोणतीही असो स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी संकटाचा सामना करण्याची ताकद,कष्ट करण्याची क्षमता,जिवाभावाची माणसे फक्त जोडायची नाहीत तर त्यांना हवी ती मदत करण्याची जिद्द शिकवण वडिलांकडून मिळाली आहे.त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे युवकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तयार असणारे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राजेंद्र राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रणवीर भैय्यांना मी जस बघतोय तसे ते युवकांबरोबर सगळ्या जाति धर्मातील माणसांना सोबत घेऊनच काम करतात.सोशल मीडियावरती सर्वात जास्त लोकप्रिय असणारे युवकांचे नेते आहेत बार्शी शहरच नव्हे तर संपूर्ण तालुका तसेच महाराष्ट्रात त्यांनी एक हाक दिली आणि हजारो युवकांचा प्रतिसाद मिळाला नाही असे कधीच झाली नाही आणि होणार ही नाही.संपूर्ण बार्शी तालुक्यातील युवकांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तबच केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे असणारी अपार कष्ट करण्याची तयारी,सर्वांना एकसंध ठेवलेल्या कार्यकर्ते यांचा सिंहाचा वाटा आहे.आमदार राजाभाऊ राऊत व रणवीर भैय्या यांनी जनतेच्या प्रत्येक संकटात मदत केली आहे व करत आहेत.कार्यकर्ता कोणत्या प्रकारचे काम करू शकतो हे त्यांनी हेरून त्या प्रत्येकाला संधी देण्याची काम केले आहे.

माझ्यासाठी प्रत्येक वर्षी आजचा दिवस खासच असतो आज रणवीर भैय्याचा वाढदिवस आहे.कर्तृत्वान युवा नेतृत्व शांत संयमी प्रसंगी धाडसी नेतृत्व, रूबाबदार प्रेमळ नेतृत्व, युवकांचे लोकप्रिय नेतृत्व.शालेय जीवनापासून सर्व युवकांचे आवडते नेते.संकटाचा सामना करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही,नंतर तुम्ही या तत्वावर चालणारे भैया आज तुमचा वाढदिवस.वडिलांच्या संघर्षाच्या ताकदीवर त्यांनी संपूर्ण बार्शी तालुक्यातील युवकांची फळी निर्माण केली. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या स्वभावामुळे रणवीर भैयाला राजाभाऊंनी राजकारणात उतरविण्याचे ठरविले. भैयाला बाजार समितीच्या निवडणुकीत उभा केले.अचूक नियोजन व योग्य प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे जामगाव गणातून त्यांची संचालक म्हणून विक्रमी मतांनी निवड झाली,तसेच सर्वानुमते त्यांची सभापतीपदी निवड झाली.

आज बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यवधींची विकास कामे झाली आहेत व अनेक कामे चालू आहेत. या बाजार समितीच्या माध्यमातून शेकडो युवकांच्या हाताला काम मिळाले आहे. भाऊंच्या व रावसाहेब मालकांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व करत असताना त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी भैय्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.युवकांचे ते लाडके नेते बनले,परंतु ते एवढ्यावर न थांबता सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत.


बाजार समितीत केलेल्या विकासकामांमुळे सभापती रूपी विकसित पर्याय शेतकर्‍यांसमोर आला.सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे पारदर्शकपणा कारभारात जाणवतो.सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे आज बाजार समितीची वाटचाल प्रगतिपथावर आहे.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची ती आपुलकीने विचारपूस करतात, यातच त्यांचा मोठेपणा जाणवतो.

लोक मला म्हणतात की तुम्ही एवढी राऊत परिवार निष्ठा का ठेवता त्याचं कारण असे की आमचे नेते राजाभाऊ व रणवीर भैय्या तसेच राऊत परिवाराचे प्रत्येक कार्यकर्त्याविषयी असणारे प्रेम संस्कार,भाऊंनी प्रत्येक वडीलधारी माणसाचा केलेला आदर हे आहे.


वडील आमदार राजाभाऊ राऊत, नगरपालिकेचे नगरसेवक विजय राऊत भाऊ अभिजित राऊत व रणजीत राऊत हे नेहमी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात.अशा सर्वगुणसंपन्न युवा नेत्याला,जिवाभावाच्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….


वाढदिवस एका वादळाचा,वाढदिवस एका धगधगत्या निखाऱ्याचा,वाढदिवस एका असामान्य नेत्याचा,वाढदिवस एका सच्चा मित्राचा,वाढदिवस एका युवकांच्या मनावर राज्य करणाऱ्यांचा,वाढदिवस एका बार्शीच्या ढाण्या वाघाचा.

हनुमंत हिप्परकर.
राऊत सोशल मीडिया,बार्शी

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here