अनाधिकृत रिक्षास्टॉप वर उभ्या केल्यास कारवाई करणार-रामदास शेळके

0
238

अनाधिकृत रिक्षास्टॉप वर उभ्या केल्यास कारवाई करणार-रामदास शेळके

बार्शी: अनाधिकृत रिक्षा वाहनतळावर रिक्षा लाऊन वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई करणार असा इशारा पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

1.जुनी चाटे गल्ली येथील बालरोगतज्ञ मोरे हॉस्पिटल समोर. 2. मंगळवार पेठ टेकडीजवळ लक्ष्मी तिर्थ रस्त्यालगत , 3. मंगळवार पेठ उत्तरेश्वर नाक्या समोर,4. एकविराई चौक, 5.भोसले चौक , येथे रिक्षा स्टँड साठी , जिल्हाधिकारी तसेच बार्शी पोलीस स्टेशन कडून कुठलाही अभिप्राय प्राप्त झालेला नाही.

त्यामुळे वरील रिक्षा स्टँड अनधिकृत असून तेथे कोणताही रिक्षा स्टॅन्ड बोर्ड लावल्यास किंवा वाहन थांब्यावर थांबून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल ,असे आवाहन रिक्षा वाहन चालकांना बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here