कृषी विभागाच्या नियमाचे पालन नाही ; बार्शी व वैरागमधील नऊ दुकानांवर कृषी विभागाची कारवाई बियाणे विक्री बंदचे दिले आदेश
कृषी विभागाची वैराग व बार्शीतील नऊ बियाणे दुकानावर कारवाई
बार्शी: खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली असून शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले असून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. विभागाच्या तपासणी मोहिमेत विक्री करताना दुकानदाराकडे खरेदीची बिले नसणे, लिंक बिले नसणे, स्टेटमेंट 1 व 2 नसणे , प्रमाणित बियाण्याचे रिलीज ऑर्डर नसणे विक्री परवाना यामध्ये कंपनीचा समावेश नसणे खरेदी रजिस्टर साठा व विक्री रजिस्टर अपूर्ण असणे आदी त्रुटी आढळून आल्याने वैरागमधील सात तर बार्शीतील दोन अशा नऊ दुकानावर विक्री बंदची कारवाई केली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात बार्शी व वैराग येथे उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रविंद्र कांबळे , तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत.
विक्री बंद आदेश दिलेल्या दुकानांत सोनार महाराज कृषी केंद्र वैराग, गावसाने ऍग्रो एजन्सी वैराग, संघवी अग्रो एजन्सी वैराग,भुमकर ऍग्रो वैराग, समर्थ कृषी केंद्र वैराग, बालाजी कृषी केंद्र वैराग, समृद्धी कृषी केंद्र वैराग, भगवंत कृषी एजन्सी बार्श, जगनाडे ऍग्रो एजन्सी बार्शी अशी आहेत.

या कृषी सेवा केंद्रातील महाबीज ,निर्मल सीड्स ,स्वयम् सीड्स, कल्पवृक्ष सीड्स ,दिव्य सीड्स ,संजय सीड्स ,सागर सीड, यशोदा सीड्स, न्होवा गोल्ड सिड , व्हिगोर बायोटेक ,हरित क्रांति सीड ,रायझिंग सन सीड ,पंचगंगा सीड ,ओम साई सीड ,सिद्ध सीड ,विनय सीड्स ,वसंत रूप सीड या कंपन्यांचे 657 क्विंटल सोयाबीन बियाणे, 33 क्विंटल तूर बियाणे, 53 क्विंटल उडीद बियाणे ,4 क्विंटल मका बियाणे , 2 क्विंटल मूग बियाणे इत्यादी विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
विक्री करताना दुकानदाराकडे खरेदीची बिले नसणे, लिंक बिले नसणे, स्टेटमेंट 1 व 2 नसणे , प्रमाणित बियाण्याचे रिलीज ऑर्डर नसणे विक्री परवाना यामध्ये कंपनीचा समावेश नसणे खरेदी रजिस्टर साठा व विक्री रजिस्टर अपूर्ण असणे इत्यादी कारणे आहेत. या कारवाईमध्ये प्रभारी गुणनियंत्रण कृषी पर्यवेक्षक गणेश पाटील यांच्यासह वैराग मंडळ चे कृषी पर्यवेक्षक एन बी जगताप संजय कराळे , भारत महांगडे, रघुनाथ कादे ,अण्णा नलवडे यांनी सहभाग नोंदवला.
सोबत फोटो आहे.