बार्शी तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म, आरोपी अटकेत
प्रतिनिधी | बार्शी
मैत्रीण घरी आहे का हे पाहण्यासाठी मैत्रीणीच्या मामाच्या घरी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गोड बोलुन जबरदस्तीने दुष्कर्म केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी आकाश उर्फ अक्षय प्रकाश मुळे (वय २५) याच्यावर दुष्कर्म तसेच पोक्सो अन्वये बार्शी तालुका पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, पोलीसांनी काही तासातच आरोपीस उंब्रज (कराड जि.सातारा) येथुन अटक केली आहे .

यातील पिडीत मुलगी हि दि.१० ऑगस्ट २०२० रोजी सायं. ७ वाजता मैत्रीणीच्या घरी गेली असता ती घरी नव्हती. त्यामुळे मैत्रीणीचा मामा आकाश उर्फ अक्षय मुळे याच्या घरी मैत्रीण आहे का हे पाहण्यासाठी गेली.
तिच्या मामास मैत्रीण घरी आहे का असे विचारले असता आरोपीने घरात कोणी नाही असे सांगून पीडीतेस गोडगोड बोलुन त्याचे राहते घरातील खोलीत नेवून जबरदस्तीने दुष्कर्म केले. यानंतर आरोपीने पिडितेस याबाबत कोणास काही सांगितल्यास पिडितास व तिच्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली.
या धमकीमुळे पिडीतेने आईस व घरच्यांना हि घटना सांगितली नाही. नंतर काही दिवसांनी पिडीतेस पोटदुखीचा त्रास होवू लागल्यानंतर वैदयकिय तपासणीनंतर पिडित मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. यानंतर पिडीत मुलीने सर्व हकीकत आईस सांगितली.
नंतर पीडीतेच्या जबाबावरून आकाश उर्फ अक्षय मुळे गुन्हा दाखल झाला. या घटनेची गंभीरता पाहता सपोनि शिवाजी जायपात्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोना.अभय उंदरे, सचिन माने, धनराज फत्तेपुरे, पोकॉ आतार या पथकाने आरोपी आकाश उर्फ अक्षय मुळे यास कराड उंब्रज येथुन अटक केली.