अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक
बार्शी प्रतिनिधी
अल्पवयीन पिडित मुलगी घराकडे परत येत असताना आरोपीने त्याच्या घराच्या पाठीमागे आंधारात नेऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना दि २२ जानेवारी रोजी रात्री ७ ते ८ : ३०च्या दरम्यान घडली .


यात संशयित आरोपी सुरज पेटाडे (वय २२) याचेवर गुन्हा दाखल झाला असुन त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .
याबाबत फिर्यादित म्हटले की ,पिडीत मुलगी ही नातेवाईकाच्या घरुन स्वगृही परत येत असताना वाटेत संशयित आरोपी सुरज पेटाडे याने पिडीतेस थांबवुन दमदाटी करत हाताला धरून त्याचे घराचे पाठीमागे आंधारात आडोश्याला घेऊन गेला व तु माझेशी बोलत नाहीस, पण मला तु आवडतेस, मला तुझे सोबत लग्न कारायचे आहे. असे म्हणत पिडीतेचा विनयभंग केला.

यानंतर पिडीत मुलीने आरोपीस ढकलुन देऊन घराकडे येऊन घडला प्रकार आईस सांगितला याबाबत पिडितेच्या आईने फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक उत्तम सस्ते हे करित आहे.