नवीन आव्हानांचा स्विकार करा : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे

0
345

नवीन आव्हानांचा स्विकार करा : पोलीस आयुक्त शिंदे

सोलापूर (२६ ऑक्टोबर) – जीवनात नवनवीन ध्येय, आव्हानांचा स्वीकार करुन त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहा यश हे निश्चित मिळेल. जीवनातील ध्येय व विचार श्रेष्ठ असतील तर फायदाही निश्चितच मोठा असतो. ध्येयसिध्दी करतांना कितीही अडथळे,अपयश आले तरी थांबू नका व नविन आव्हानांचा स्विकार करा, असे प्रतिपादन शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्यक्त केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ते पोलीस आयुक्तालय येथे आयोजित नवनिर्वाचित २० पोलीस-निरीक्षक यांच्या सत्कार व निरोप समारंभाप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जे मनात नकारात्मक विचार कधीही येवू देत नाहीत, तेच प्रत्येक आव्हाने स्विकारतात आणि यशापर्यंत पोहोचतात.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवनियुक्त पोलीस उप-निरीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस आयुक्तालयाकडुन सर्व पोलीस-निरीक्षकांचा सन्मानचिन्ह व पेढे देवून सत्कार व निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त बापु बांगर व प्रभारी पोलीस अ-आयुक्त श्रीमती रुपाली दरेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास पोलीस अ-आयुक्त डॉ. वैशाली कडुकर, सहा. पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त अभय डोंगरे तसेच इतर अधिकारी, पोलीस अंमलदार व नवनियुक्त पोलीस अ-निरीक्षकांचे कुटुंबीयअस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक फुगे, पोहेकॉ. तारानाईक यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोकॉ. मलकप्पा बणजगोळे यांनी केले.

ThinkSolapur Solapur City Police

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here