अबब.. बापरे.. कहर..सोलापूर शहरात 116 तर ग्रामीण जिल्ह्यात 330 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
551

अबब.. बापरे.. कहर..सोलापूर शहरात 116 तर ग्रामीण जिल्ह्यात 330 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

ह सर्व शब्द अपुरे पडतील इतका मोठा आकडा आजचा आहे. आज शहर मध्ये 116 तर ग्रामीणमध्ये 330 असे एकूण 446 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्रामीणमध्ये पंढरपूर आणि बार्शी येथून रुग्णांची संख्या अधिक येत आहे.आज बार्शीत तब्बल 106 तर पंढरपुरात 73 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले.आजवरचा हा उच्चांक म्हणावा लागेल.

अर्थात चाचणी अहवाल येण्याचं प्रमाणही वाढलं आहे.                          
शहरात आज  2939 तर ग्रामीणमध्ये 2241 असे एकूण       5180 अहवाल प्राप्त झाले आहेत .
 
आज ग्रामीणमधे 8 मृतांची नोंद आहे. शहरात एकही मृत्यू नाही. ग्रामीणमध्ये 186 आणि शहरात 79
असे एकूण 265 जण कोरोना मुक्त झालेत.

ग्रामीण भागातील  स्थिती

आज यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील 70 वर्षीय पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 53 वर्षे पुरुष, कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील 70 वर्षीय पुरुष, शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील 65 वर्षांची महिला, कुर्डू (ता. माढा) येथील 70 वर्षांची महिला, पापनस (ता. माढा) येथील 35 वर्षीय पुरुष, बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी येथील 52 वर्षीय पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 80 वर्षांची महिला यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 205 इतकी झाली आहे. अद्यापही दोन हजार 905 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर चार हजार 280 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही 152 जणांचा अहवाल प्रलंबित आहे.


या ठिकाणी आढळले रुग्ण

आज अरळी (ता. अक्कलकोट), दुधनी, गुड्डेवाडी, समर्थनगर, करजगी, खासबाग, कुरनूर, नागणसूर, मानेगाव, करमाळा तालुक्‍यातील अर्जुननगर, भवानी नाका, भीमनगर, देवळाली, कुंभेज, माढा तालुक्‍यातील अरण, बेंबळे, भोसले, कुर्डू, कुर्डुवाडी, मोडनिंब, परिते, पिंपळनेर, रणदिवेवाडी,

श्रीरामनगर, मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव, परळी, मरवडे, पाटखळ, सलगर, तळसंगी, तामदर्डी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील हगलूर, इंडियन ऑइल डेपो, पाकणी, पडसाळी, वडाळा, सांगोला तालुक्‍यातील बलवडी, जवळा, कारंडेवाडी, नाझरे, राजुरी, सणगर गल्ली, यलमार, मंगेवाडी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी, दर्गनहल्ली, टाकळी,

पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, बडवे गल्ली, भक्तिमार्ग, भोसले चौक, दाळे गल्ली, धर्मशाळा, उपजिल्हा रुग्णालय, एकनाथनगर, गादेगाव, गुरसाळे, इसबावी, जुने पेठ, कवठाळी, कोळी गल्ली, लक्ष्मी टाकळी, माहेश्वरी धर्मशाळा, नवी पेठ, परदेशीनगर, पोलिसलाइन, प्रदक्षिणा मार्ग, रोपळे, संत पेठ, सरकोली, सावरकर मैदान, शासकीय वसाहत, सिद्धेवाडी, सुस्ते, तानाजी चौक, तुंगत, उत्पात गल्ली, विवेक वर्धिनी विद्यालयजवळ,

माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव, कोर्टासमोर, माळशिरस, कोंडारपट्टा, महाळुंग, माळेवाडी, माळीनगर, मांडवे, नातेपुते, पिलीव, संगम, संग्रामनगर, शेंडेचिंच, श्रीपूर, यशवंतनगर, मोहोळ तालुक्‍यातील गोटेवाडी, हराळवाडी, कामती बुद्रूक, कुंभार गल्ली, कुरूल, समर्थनगर,

बार्शी तालुक्‍यातील 422 झोपडपट्टी, आगळगाव, ऐनापूर मारुती रोड, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, भालगाव, भवानी पेठ, भीमनगर प्लॉट, भवानी पेठ, बुरूड गल्ली, दडशिंगे, दत्तनगर, गाडेगाव रोड, घारी, जैन मंदिराजवळ, बार्शी-जामगाव रोड, कसबा पेठ, लातूर रोड, लोकमान्यता, मंगळवार पेठ, महादेवी नगर प्लॉट, जैन मंदिराजवळ, मुरलीधर मंदिराजवळ, सह्याद्री खानावळ,

सात्विक सौंदर्य, शिवशक्ती मैदान, श्रीपत पिंपरी, धनगर गल्ली, सुलाखे हायस्कूल रोड, सुश्रुत हॉस्पिटल क्वार्टर, ताडसौंदणे, तेल गिरणी चौक, तुळजापूर रोड, उंबरगे, उपळे दुमाला, वैराग प्लॉट, झाडबुके मैदान या ठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

आज सोलापूर शहरात नवीन 116 रुग्ण आढळले आहेत .मोठ्या प्रमाणावर शहर परिसरात कोरोना टेस्ट करण्याचे प्रभाग निहाय नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार टेस्टिंग होत आहे परंतु, अजूनही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तपासणी प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.


आज एकही कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज पर्यंत एकूण 387 जणांचा बळी या आजाराने गेला आहे. यामध्ये 258 पुरुष तर 129 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5805 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 387 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 939 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4479 इतकी लक्षणीय आहे

आजवरची शहरी-ग्रामीण कोरोना स्थिती
*पॉझिटिव्ह*
शहर       5805
ग्रामीण    7390
एकूण     13,195

*मृत* 

शहर    387
ग्रामीण 205
एकूण 592

*उपचार सुरु*

शहर      939
ग्रामीण 2905
एकूण  3844

*कोरोना मुक्त*

शहर   4479
ग्रामीण 4280
एकूण  8759

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here