एखाद्या नेतृत्वावर जनता किती प्रेम करते याच ज्वलंत उदाहरण म्हणजे युवा हृदयसम्राट श्री रणवीर भैय्या राऊत. काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी शहर, तालुका व इतर तालुक्यातील,जिल्ह्यातील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.अवघ्या २५ वर्षांमध्ये एखाद्या कार्यकर्तृत्वान नेतृत्वाला त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे किती लोकप्रियता मिळते व किती जनाधार मिळतो हे काल समस्त बार्शीकरांनी पाहिल असेल.

आमदार राजाभाऊ राऊत यांचा सर्वसामान्यांत मिसळण्याचा, त्यांच्या अडचणीत धावून जाण्याचा विचारांचा वारसा पुढे चालवणाऱ्या युवा नेतृत्वाच्या रणवीर भैय्यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी शहर व तालुक्यातील प्रचंड युवा, प्रौढ व त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते त्यांना दिवसभर प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देत होते. दिवसभर त्याच संयमाने व चेहऱ्यावरच्या स्मित हास्याने प्रत्येक शुभेच्छांचा स्विकार रणवीर भैय्या करत होते. खरंच एखादा व्यक्ती समाजात काम करत असताना किती निष्ठेने काम करतो आणि त्याच निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तीवर जनता किती प्रेम करते हे काल असंख्य लोकांनी पाहिलं.
रात्री १२ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्री १२ पर्यंत शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेम करणारी व्यक्ती भैय्यांकडे येत होती. आदल्या दिवशीचा शुभेच्छांचा वर्षाव नंतर भैय्या दुसऱ्या दिवशी दुपारी १२ ते साधारण सायंकाळी ६ वाजेपर्यंत ग्रामीण भागातील प्रचंड त्यांचे चाहते त्यांच्यावर प्रेम करणारी व्यक्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रचंड गर्दी करून त्यांना शुभेच्छा देत होती. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की भैय्यांपर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचल्या पाहिजे त्यासाठी प्रत्येक व्यक्ती तन-मन-धन लावून त्या ठिकाणी उपस्थित होता.
त्याचबरोबर संध्याकाळी साधारणपणे सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत भोसले चौक येथील ऑफिसमध्ये शहरातील अनेक व्यक्ती भैय्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत होत्या. सकाळी ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील गर्दी होती त्याच पद्धतीने संध्याकाळी शहरातील असंख्य चाहत्यांची गर्दी शुभेच्छा देण्यासाठी झाली होती. याच गर्दीतून एका टेम्पो वरती पाच ते सहा हार लावून हलगी वाजवत घेऊन येणारे चाहते पाहिले आणि साक्षात ज्या पद्धतीने आपण देवाला हार घेऊन जातो त्या पद्धतीने चाहते युवा नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी येत होते. ही गर्दी प्रेमाची, कार्यकर्तुत्वाची, निष्ठेची, अडीअडचणीच्या वेळी केलेल्या मदतीची साक्ष देणारी होती.

अवघ्या एवढ्या वयामध्ये देखील या कार्यकर्तृत्व नेतृत्वाला अभूतपूर्व मिळालेल्या शुभेच्छा खरंच येणाऱ्या भविष्याची दिशा दाखवत होत्या. या सर्व प्रत्यक्ष भेटीच्या शुभेच्छा बरोबर बार्शी शहर व तालुक्यात लावलेले त्यांचे फ्लेक्स त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी ठेवण्यात आलेली समाज उपयोगी विविध कार्यक्रम व सर्वात नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे सोशल मीडिया वरती भैय्यांवर गेल्या एक महिन्यापासून होत असलेला शुभेच्छांचा वर्षाव. आपण महाराष्ट्रातील असंख्य राजकारणी पाहिले असतील असंख्य युवा राजकारणी पाहिले असतील परंतु या सर्वांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व म्हणजे रणवीर भैय्या.
सोशल मीडिया वरती प्रत्येक एका फोटो नंतर किंवा एका फोटो लगत एक फोटो हा रणवीर भैय्या यांचा होता. या सर्व गोष्टींबरोबर त्यांना शुभेच्छा दिल्यानंतरचे फोटो देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वरती अपलोड होत होते आणि त्या प्रत्येक फोटोमध्ये नेत्यासोबत त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील सांगत होता की, आमचा या युवा नेतृत्वावर किती विश्वास आहे खरंच आपण राजकारणी लोकांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो परंतु असे काही राजकारणी व्यक्तिमत्व असतात कि ती प्रत्येकाच्या मनावरती, हृदयावरती अधिराज्य करतात. असेच एक बार्शी तालुक्याला लाभलेल, अनेकांच्या हृदयांवरती कोरलेलं, सक्षम, लोकप्रिय, कार्यक्षम नेतृत्व म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर भैय्या राऊत.
यांच्या या कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या या कर्तुत्ववान नेतृत्वाला, त्यांच्या प्रत्येक व्यक्तीशी जोडलेल्या भावनेला, त्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर निर्माण केलेल्या अफाट जनसमुदायाला सलाम. त्यांच्या या लोकप्रियतेच्या माध्यमातून, कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून या बार्शी शहर आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि या तालुक्याला एक वेगळी सुजलाम सुफलाम ओळख निर्माण व्हावी हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!💐💐
लेखन,
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आलेला एक प्रत्यक्षदर्शी नागरिक.