प्रसिद्ध राज घराण्यातील
ऐतिहासिक दुर्मिळ गणेश तिकीटांचा संग्रह
सोलापूर : स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये भारतात अनेक इतिहास प्रसिद्ध राजघराणी होती. त्या काळातील संस्थानिकांची चलनी नाणी, नोटा, स्टम्प, कोर्ट फी टीकिट ,बाँड पेपर, पोस्टकार्ड, व इतर ऐतिहासिक दस्तावेज सध्याच्या स्थितीत कालबाह्य होत आहेत. या आमूल्य वारसांचा संग्रह गोळा करून ते संवर्धन करण्याचे कार्य सोलापूरातील इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर करत अाहे.


स्वातंत्रपूर्व भारतात अनेक संंस्थाने होती. त्यापैकी मिरज, सांगली, कुरूंदवाड जूनियर, जमखंडी आदी महत्वपूर्ण संस्थानाचे कुलदैवत श्री गणपती होते. हे संपूर्ण संस्थानिक राजघराणी गणेशाचे भक्त होते. म्हणूनच त्यांनी आपले आराद्य दैवत श्री गणरायाचा बसलेला फोटो विविध रंगात आपल्या संस्थनिक तिकीटावर, बाँड पेपरवर छापलेला दिसून येतो.

असे विविध 4आणे, 8आणे,10आणे, एक रूपया असे विविध किमतीचे असंख्य तिकीटे अणवेकर यांच्या संग्रही आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासून अनेक गावातील सर्वे करून संकलन करत आहेत. अणवेकर यांच्या संग्रहात 150 हून जास्त विविध संस्थानिकांची असंख्य पत्रे, तिकीटे, बाँड पेपर, कोर्ट फी, तिकीटे, मोडी दस्तावेज व विविध 40 हजारहून जास्त वापरलेले तिकीटे पाहायला मिळतात.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात संशोधनात्मक सर्वे करत असताना सिद्धापूर गावातील समाज सेवक संतोष सोनगे यांच्याकडील काही दुर्मिळ कागदपत्रे पाहताना सांगली संस्थानिकाच्या गणपतीचा फोटो असलेले पाहायला मिळाले. तेव्हा समजले की, सोलापूर जिल्ह्यातील काही गावे ही जुन्या सांगली संस्थानात मोडत होते हे कळाले. आज ही या परिसरातील अनेक गावातील लोकांकडे विविध गणपतीचे चित्रे असलेले संस्थानिकांची तिकीटे पाहायला मिळतात, असे अणवेकर यांनी सांगितले.
