वकील महिलेवर सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल
सोलापूर : उपनिबंधक कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनुसार महिला वकिलाच्या घरझडतीदरम्यान घरात पाच ते सहा कोरे चेक आढळल्याने आहे. महिलेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी विश्वनाथ नाकेदार यांनी
जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून अॅड. गुरुदेवी रेवनसिद्ध कुदरी (रा. भवानी पेठ, मंडी वस्ती) हिच्यावर गुन्हा दाखल झाला


जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडे आरोपी कुदरी ही लोकांना जादा दराने व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून कोरे चेक व कागदपत्रे ठेवून घेत असल्याची तक्रार एका महिलेने दिली होती. या तक्रारीवरून उपनिबंधक कार्यालयाकडून कुदरी यांच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली.
यात जवळपास पाच ते सहा जणांचे नावाचे कोरे चेक आढळले. या घटनेचा पंचनामा करून उपनिबंधक कार्यालयाकडून नाकेदार यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अॅड. कुंदरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि पवार हे करत आहेत.