सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी (ता. 8) सोलापूर शहरात 90 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामीण भागातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे शहरात पाच जणांचा तर ग्रामीणमध्ये तिघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भवानी पेठ, उमा नगरी, एकता नगर, सिध्दी अर्पाटमेंट आणि, अभिषेक नगर येथे प्रत्येकी चार तर शाहीर वस्तीत सर्वाधिक सात रुग्ण सापडले आहेत.

शहरात या’ भागात सापडले नवे रुग्ण
सोनामाता नगर, लक्ष्मण सोसायटी (विजयपूर रोड), शाहीर वस्ती, होमकर नगर (भवानी पेठ), एकता नगर (अशोक चौक), शिवगंगा नगर, बनशंकरी नगर (शेळगी), आंबेडकर नगर, सिध्दी अपार्टमेंट (सम्राट चौक), मल्लिकार्जुन नगर, गजानन नगर, बसवेश्वर नगर (मजरेवाडी), कल्याण नगर, जुळे सोलापूर, रविशंकर गार्डन (जुळे सोलापूर), जुनी पोलिस लाईन, अभिषेक नगर (मुरारजी पेठ), उमा नगरी, कृष्णा कॉलनी (सैफूल), इस्ट हाय अर्पाटमेंट (साईबाबा चौक), विडी घरकूल (हैदराबाद रोड), थोबडे वस्ती (देगाव नाका), दक्षिण कसबा (जोशी गल्ली), लोधी गल्ली (उत्तर सदर बझार), हुच्चेश्वर नगर, लक्ष्मी नगर, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), विडी घरकूल, वडार गल्ली (बाळीवेस), उत्तर कसबा, सत्यनाम नगर (लष्कर), कामत वसाहत (एमआयडीसी रोड),
पूर्व मंगळवार पेठ, एमएनसी कॉलनी (बुधवार पेठ), पश्चिम मंगळवार पेठ, गांधी नगर, गोल्डफिंच पेठ, कमला नगर, भवानी पेठ, टिळक चौक, मुरारजी पेठ, खडक गल्ली, गवई गल्ली (टिळक चौक), रविवार पेठ, भाग्यश्री पार्क (होटगी रोड), यश पॅलेस, अवंती नगर, अश्विनी हॉस्पिटलजवळ, शेळगी, जुनी विडी घरकूल, उत्तर कसबा, ललिता नगर (शांती रोड) आणि रंगराज नगर याठिकाणी नवे रुग्ण सापडले आहेत.


आज बाणेगाव तालुका उत्तर सोलापूर दोन पुरुष, कोंडी एक पुरुष, मार्डी पाच पुरुष, तिर्हे दोन पुरुष ३ महिला दक्षिण सोलापुरातील नवीन विडी घरकुल तीन पुरुष,5 महिला, कुंभारी येथे दोन पुरुष, लिंबी चिंचोळी मध्ये तीन पुरुष, एक महिला. मुळेगाव दोन महिला, मुळेगाव तांड्यावर दोन पुरुष, एक महिला. मुळेगाव एक महिला, कासेगाव एक पुरुष ,हत्तुर तीन पुरुष, तीन महिला ,वांगी दोन पुरुष, तीन महिला मंद्रूप दोन पुरुष, बसवनगर एक पुरुष ,वडापूर एक महिला ,नांदणी एक पुरुष ,होटगी,पुरुष एक महिला,
तर मोहोळ तालुक्यातील वाळुज येथे एक पुरुष ,माढा तालुक्यातील भोसरे येथे एक पुरुष, एक महिला पंढरपूर येथील गोपाळपूर एक पुरुष मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे एक पुरुष अक्कलकोट बुधवार पेठ भागातील एक पुरुष, दुधनी येथील एक पुरुष एक महिला बोरगाव दे मध्ये 1 पुरुष करजगी एक महिला तर बार्शी येथील कसबा पेठेत एक पुरुष वैराग एक पुरुष एक महिला,घाणेगाव 1 पुरुष बाधित असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 673 इतकी झाली आहे. यामध्ये 428 पुरुष तर 245 महिला आहेत यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 30 जणांचा मृत्यू झाला आहे यात 23 पुरुष तर सात महिलांचा समावेश होतो.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 332 आहे यामध्ये 222 पुरुष 110 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 311 आहे यामध्ये 184 पुरुष तर 127 महिलांचा समावेश होतो.