दिवसभरात ६० जण कोरोनावर मात करून झाले ठणठणीत बरे
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात आजही एकूण टेस्टच्या प्रमाणात रुग्णसंख्या कमी प्रमाणात आढळल्याचे दिसून आले आहे. आज दिसभरात जिल्ह्यात १७८ आरटीपीसीआर टेस्ट तर ६१२ रॅपिड अँटिजन टेस्ट करणात आल्या त्यापैकी ८४ नवे बाधित समोर आले आहेत. आज बाहेर जिल्ह्यात एक हि जण पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १३ हजार ३७६ वर जाऊन पोहचली आहे.

आज आढळलेल्या सर्व चाचण्यांमधील ८४ बाधितांमध्ये २२ जण आरटीपीसीआर द्वारे तर ६२ लोकांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उस्मानाबाद तालुक्यामध्ये २६ रुग्ण आढळून आले असून ०३ जण आरटीपीसीआरद्वारे व २३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

तुळजापुर येथील ६ जणांना कोरोनाची लागन झाली असुन २ जनाची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आढळली तर ४ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा तालुक्यात १९ जण बाधित झाले असून असून ४ जण आरटीपीसी मध्ये १५ जनाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. लोहारा तालुक्यात पॉझिटिव्ह आलेल्या एकाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंबमध्ये १६ जणांना लागन झाली असुन ११ जणांची आरटीपीसीआर टेस्ट तर ५ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. वाशीमध्ये ८ जणांना लागन झाली असुन १ जण आरटीपीसीआरद्वारे ७ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भूमध्ये ५ जनाची अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.परंडा येथे ३ जणांना कोरोनाची लागन झाली असुन एक जण आरटीपीसीआरद्वारे २ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
तर आज मृत्यूमुखी पडलेल्या ३ रुग्णामध्ये उस्मानाबाद शहरातील शांतिनिकेतन येथील ८० वर्षीय पुरुष व बौद्ध नगर येथील ६९ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील ५५ वर्षीय स्त्री चा उपचारादरम्यान मृत्यू झाला.