उपळाई येथे घर फोडुण 73 हजाराचा ऐवज लंपास

0
252

बार्शी; बेडरूमचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा 73 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथे घडला.

73 thousand lamps were blown up at Upalai
दिपक मुसळे वय 42 , रा.उपळाई ठोंगे, ता.बार्शी, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सर्वजण जेवण करुन झोपले. पहाटे 05.30 वा चे सुमारास पत्नी झोपेतुन उठुन बाहेर आली त्यावेळी तीला जिन्याचे गेटचे कुलुप तोडुन जिन्या शेजारी असलेल्या बेडरुमचा दरवाजा उघडा दिसला व त्यातील लोखंडी कपाट उघडे दिसले म्हणुन तीने मला येवुन सांगितले त्यांनतर मी कपाटातील रोख रक्कम व दागिने पाहिले असता ते मला दिसुन आले नाहीत व दागिन्याच्या डब्या खाली पडलेल्या दिसल्या. त्यावरुन माझी खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

36000/-रुपये किंमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण ,10,000/- रु त्यात अर्धा तोळा वजनाची सोन्याची कर्णफुले ,3000/- रु त्यात दिड ग्रँम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंगा ,2000/-रु त्यात अर्धा ग्रँम वजनाची सोन्याची बाळी ,4000/-रु त्यात एक ग्रँम वजनाचे सोन्याचे दोन बदाम व 18,000/-रु रोख रक्कम असा 73,000/-रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here