सोलापूर शहरात 70 तर ग्रामीण जिल्ह्यात 340 कोरोना पॉझिटिव्ह; एकूण 15 जणांचा मृत्यू

0
800

सोलापूर शहर आणि जिल्हा असे एकत्रित 410 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत आणि शहर 2 तर ग्रामीण 13 असे 15 रुग्ण मयत झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना ग्रस्तांची संख्या 19 हजार 720 एवढी झाली आहे. पैकी 14 हजार 792 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सोलापूर शहर आणि ग्रामीण अशी जिल्ह्यात आज ( दि 4 सप्टेंबर रोजी ) शहरात आज 1257 तर ग्रामीणमध्ये 2937 असे 4194 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी शहरात 70 पॉझिटिव्ह तर ग्रामीण मध्ये 340 असे एकूण 410 हा रुग्ण आढळून आले आहेत. तर शुक्रवारी शहरात 2 तर ग्रामीणमध्ये 13 अशी 15 जणांची मृत म्हणून नोंद झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


दरम्यान शुक्रवारी शहरात 118 तर ग्रामीणमध्ये 190 असे 308 जण आज कोरोना मुक्त झाले. आजवर शहर -ग्रामीण मिळून जिल्ह्यात 19734 पॉझिटिव्ह रुग्ण 798 मृत्यू, 4104 उपचार सुरू 14792 कोरोना मुक्त झाले आहेत.

पंढरपूर तालुका सर्वात आघाडीवर

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पंढरपूर तालुक्यात दिसून येत आहे. 4 सप्टेंबर पर्यंत पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक 2 हजार 835 एवढे रुग्ण सापडले आहेत. मात्र तुलनेत मृत्यू दर कमी असून 58 लोकांचे कोरोना विरोधी लढयात प्राण गेले आहेत. जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक 97 रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here