55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घरीच थांबावे, मुंबई पोलीस आयुक्तांचा निर्णय

0
268

मुंबई | मुंबई पोलीस दलातील तीन हवालदारांनी ‘कोरोना’मुळे प्राण गमावले आहेत. यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अत्यंत तातडीची पावलं उचलली आहेत. 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस खात्यातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

ज्यांचं वय 55 वर्षापेक्षा जास्त आहे. त्यांनी बंदोबस्तावर सहभागी होऊ नये, अशा सूचना मुंबई पोलिस आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारीही कोरोनाचे बळी ठरत आहेत. यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-

Best IT Comany In Maharashtra , Solapur