बार्शीत रविवारी सापडले 52 कोरोना रुग्ण ; नगराध्यक्ष असिफ तांबोळी ही कोरोनाबाधित

0
393

बार्शीत रविवारी सापडले 52 कोरोना रुग्ण ; नगराध्यक्ष असिफ तांबोळी ही कोरोनाबाधित; स्वतः केले जाहीर

बार्शी : बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत तांबोळी यांनी आपण कोरोनाबाधित झाल्याचे सोशल मिडियावर पोस्ट टाकून जाहीर केले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या पोस्ट मध्ये ते म्हणतात, गेल्या ३-४ महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने दरम्यानच्या बैठका, भेटीगाठी, पाहणी, अन्नछात्रालय, संपर्क ,कार्यालयातील उपस्थिती यादरम्यान आपल्याला दुर्देवाने कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आपण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत. कोरोनाशी लढा देवुन लवकरच आपण जनसेवेत रजू होऊ, असे नमूद केले आहे.

तसेच कोरोनाला घाबरू नका, कोरोनावर आपण मात करू शकतो, हा हिमतीने लढायचा आजार आहे. याच्यामध्ये घाबरण्याचे कारण नाही. सर्दी-पडसे पेक्षा किरकोळ आणि फालतू आजार आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे.

आणि याच्यावर अद्याप औषध नाही. गरम पाणी पिणे, गरम वाफ घेणे, लिंबू पाणी गरम पाण्यात घेणे, सकस आहार घेणे, कडधान्य घेणे, एवढाच उपचार आपण घरी बसून सुद्धा करू शकतो. हॉस्पिटलायजेशन सुद्धा होण्याची आवश्यकता नाही असा माझा वैयक्तीक अनुभव आहे.अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे.

52 पॉझिटिव्ह

आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कोरोना अहवालात बार्शी तालुक्यात आज पुन्हा 27 पुरुष आणि 25 स्त्री असे 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बार्शीतील कोरोना बधितांचा आकडा हा 414 झाला आहे. तालुक्यातील आजवर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.110 जण उपचारानंतर बरे झाले असल्याने त्यांना घरी सोडले आहे.तर 296 जनावर कोविड केअर सेंटर, जगदाळे मामा हॉस्पिटल आणि अंधारे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here