सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी 33 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 22 पुरुष, 11 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 तर आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 850 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी रविवारी दिली.

आजचे कोरोनाबाधित रुग्ण मंगळवेढा करमाळा, , उत्तर सोलापूर ,मोहोळ ,दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी तालुक्यातील आहेत.आज कौठाळी, अनगर, बावी, पानगाव याठिकाणी प्रथमच कोरोनाची एन्ट्री झाली आहे.
‘या’ गावात सापडले 33 कोरोना पॉझिटिव्ह
रविवारी (ता. 12) सोलापूर ग्रामीणमध्ये 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण रुग्णंसख्या 850 झाली असून दोन मृत्यूसह मृतांची संख्या 36 वर पोहचली आहे.

आज मंगळवेढ्यातील बोराळे येथे दोन, करमाळ्यातील जिंतीत सहा, पंढरपुरातील अनिल नगरात एक, तर दक्षिण सोलापुरातील भंडारकवठ्यात दोन, नवीन विडी घरकुलात एक, होटगीत एक, वळसंगमध्ये चार, घोडा तांड्यात तीन, उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळीत प्रथमच एक, तळे हिप्परगा येथे दोन, मोहोळ तालुक्यातील अनगरमध्ये पहिल्यांदाच एक रुग्ण सापडला आहे.
तसेच अक्कलकोटमधील कुरनूर येथे एक, मैंदर्गीत एक, तर बार्शीतील भवानी पेठेत एक, नाईकवाडी प्लॉटमध्ये एक, सुनिल सावंत सर्व्हिसजवळ एक, बावीत एक, वैरागमध्ये दोन, पानगावात एक रुग्ण सापडला आहे.
ठळक बाबी….
सोलापूर ग्रामीणमधील आतापर्यंत सहा हजार 295 व्यक्तींची झाली कोरोना टेस्ट
आतापर्यंत ग्रामीणमध्ये आढळले 850 कोरोना पॉझिटिव्ह; त्यापैकी 36 जणांचा झाला मृत्यू
ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 72 जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित
एकूण 850 रुग्णांपैकी 340 रुग्णांनी केली कोरोनावर मात; अद्याप 574 रुग्णांवर उपचार सुरु
आज चिंचगाव (ता. माढा) येथील 52 वर्षीय महिलेचा तर मनगिरे मळा (बार्शी) येथील 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने घेतला बळी
तालुकानिहाय रुग्णसंख्या

अक्कलकोट : 156
बार्शी : 178
करमाळा : 12
माढा : 26
माळशिरस : 11
मंगळवेढा : 5
मोहोळ : 45
उत्तर सोलापूर : 91
पंढरपूर : 42
सांगोला : 5
दक्षिण सोलापूर : 279
एकूण : 850