सचिन पायलट समर्थनात ३०० काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
काँग्रेसने बंडखोर नेते उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदार विरोधआत काँग्रेस पक्षाने आता कठोर पाऊले उचलायला सुरवात केली आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात झालेल्या निर्णयानुसार सचिन पायलट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाही करत उपमुख्यमंत्रिपदावरून तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे .


यानंतर राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ पक्षातील आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यात जवळपास ३०० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात जिल्हा आणि विभाग अध्यक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या अडचणीत वाद होणार आहे.
राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीतील जवळपास 30 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिल्यानंतर पक्षाचे प्रभारी अविनाश पांडेय यांनी राज्याची पक्ष कार्यकारिणी बरखास्त केली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीसह आता नव्या कार्यकारिणीची आणि विभाग आणि जिल्हा समितींची निवड करण्यात येईल. पांडेय म्हणाले, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या परवानगीशिवाय कुणीही माध्यमांशी बोलणार नाही असे ही ठणकावण्यात आले आहे.