सोलापुरात ३ कोटींचे सोने जप्त; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –

0
384

सोलापुरात ३ कोटींचे सोने जप्त; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –

सोलापूर : सोलापूरमधील टोलनाक्याजवळ विशाखापट्टणमहून मुंबईला जाणाऱ्या कारमधून पोलिसांनी ३ कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. सहा किलो सोने कारमधील सीटखाली लपवून आणले जात होते. या प्रकरणी चालकासह दोघांना अटक केली आहे. ही मोठी कारवाई सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती रविवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर संबंधित कार (डब्ल्यूबी 02 – एपी 1596) आली असता रात्री 10 वाजता पोलिसांनी ती अडवली. त्यात कारचालक व अन्य एकजण होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारण उत्तरे दिली नाही. गाडीत काहीच नसल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता चालकाच्या सीटखाली लॉकर असल्याचे आढळून आले. ते उघडून पाहिली असता त्यामध्ये एक किलोप्रमाणे सहा सोन्याची बिस्किटे मिळून आली.

याबाबत चौकशी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ही बिस्कीटे आटपाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्‍याम बुवा, संदीप काशीद, विजय भरले, श्रीकांत गायकवाड, लाला राठोड व बापू शिंदे यांनी केली.

त्यांच्याकडून तस्करी होत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी सकाळपर्यंत हे सोने चोरीचे आहे, की जीएसटी चुकवून नेले जात होते, याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here