सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात तब्बल 285 पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू

0
526

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज सरासरी 250-300 च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. . विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शुक्रवारी ग्रामीण भागातील तब्बल 285 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 180 पुरुष तर 105 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 237 आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1698 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1413 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बार्शी तालुक्‍यातील खामगाव येथील 75 वर्षाचे पुरुष, कांदलगाव येथील 80 वर्षाची महिला, नारी येथील 60 वर्षाचे पुरुष, अलीपूर रोड येथील 50 वर्षाची महिला, सांगोला तालुक्‍यातील नाझरे येथील 57 वर्षाचे पुरुष व 70 वर्षाची पुरुष तर कारखाना रोड मित्र नगर मंगळवेढा येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी तालुक्यात शुक्रवारी सापडले ४७ रुग्ण; एक मयत

आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात आठ हजार 946 जण बाधित झाले आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या 250 एवढी झाली आहे. कोरोनावर अद्यापही दोन हजार 866 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाच हजार 830 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडले आहे. अद्यापही 144 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

या गावात आढळलेले नवे करून अबाधित
अक्कलकोट तालुक्‍यातील अरळी, गौडगाव, समर्थनगर, वागदरी, बार्शी तालुक्‍यातील आगळगाव, अलीपूर रोड, अशोक नगर, बारंगुळे प्लॉट, बुरुड गल्ली, घोडके प्लॉट, कासारवाडी रोड, कसबा पेठ, काटेगाव, कोरफळे, लोखंड गल्ली, पंकज नगर, फुले प्लॉट, शेंद्री, श्रीपत पिंपरी, सुभाषनगर, ताडसौदणे, उक्कडगाव, उपळाई रोड, वैराग, यशवंनगर,

जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द; जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची कारवाई

माढा तालुक्‍यातील बावी, भोसरी, चिंचगाव, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, रिधोरे, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बागेचीवाडी, बोरगाव, दसूर, फोंडशिरस, खंडाळी, कोंढारपट्टा, कुसमोड, लवंग, महाळूंग, माळीनगर, संग्रामनगर, वडगाव, श्रीपूर, तांदुळवाडी, शिक्षक कॉलनी, वेळापूर, यशवंनगर, मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, दामाजी नगर, डिकसळ, हजापूर, जित्ती, लक्ष्मी दहिवडी, नंदूर,

मोहोळ तालुक्‍यातील सावळेश्वर, येल्लमवाडी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बीबी दारफळ, गुळवंची, पडसाळी, इंडियन ऑइल कंपनी पाकणी, पंढरपुरातील अनिल नगर, भंडीशेगाव, चळे, चंद्रभागा घाट, दाळे गल्ली, एकलासपूर, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, इसबावी, कान्हापुरी, खर्डी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, नवीपेठ, नवीन कराड नाका, अर्बन बॅंकेजवळ, विठ्ठल मंदिराजवळ, परदेशी नगर, संभाजी चौक, सांगोला रोड, संतपेठ, शेळवे, उमदे गल्ली,

सांगोला तालुक्‍यातील अनकढाळ, कोष्टी गल्ली, महूद, मांजरी, मेथवडे, सावे, वाकी, दक्षिण सोलापुरातील वळसंग, बोरामणी, मनगोळी, होटगी स्टेशन, करमाळ्यातील भीम नगर, चांगुडे गल्ली, गणेश नगर, जातेगाव, केम, कोळगाव, कृष्णाजी नगर, मंगळवार पेठ, साडे गल्ली, संभाजीनगर, सावडी, सवत गल्ली, सुतार गल्ली, वेताळ पेठ, विद्यानगर याठिकाणी आज नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here