सोलापूर : सोलापूर शहरात आज 404 संशयितांच्या अहवालातून 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील जनजीवन पूर्ववत होत असतानाच बाजारात मोठी गर्दी आहे. मात्र, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, पोलिसांची कारवाई आणि सॅनिटायझरचा वापर केल्याने शहरातील संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे. आज दोघांचा मृत्यू झाला असून शहरातील मृतांची संख्या आता 399 वर पोहचली आहे.


अरफात नगर (एमआयडीसी), सुविद्या नगर, वॉटर फ्रंट सोसायटी (विजयपूर रोड), म्हाडा बिल्डींग, धनश्री नगर, रेणुका नगर (जुळे सोलापूर), जुना आरटीओ ऑफीसमागे, फॉरेस्ट (रेल्वे लाईन), वसंत विहार (पुना नाका), शाम नगर (मोदी खाना), सिध्देश्वर नगर (दक्षिण सदर बझार), मुकूंद पेठ (भवानी नगर), हनुमान नगर (पंचमुखी चौक), आनंदधाम पोलिस वसाहत, आसरा चौक, दमाणी नगर, गुरुनानक नगर, तस्लिम गल्ली याठिकाणी नव्याने रुग्ण सापडले आहेत.

शहरातील 27 हजार संशयितांनी पाळला नियम
रुग्णांच्या थेट तथा अप्रत्यक्षरित्या संपर्कातील 20 हजार 739 संशयितांना महापालिका प्रशासनाने होम क्वारंटाईन केले होते. त्यापैकी 16 हजार 106 व्यक्तींनी 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. सद्यस्थितीत चार हजार 633 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. दुसरीकडे संस्थात्मक विलगीकरण कक्षातील 13 हजार 57 संशयितांपैकी 11 हजार 278 व्यक्तींनी त्यांचा कालवधी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता संस्थात्मक विलगीकरणात 158 तर होम आयसोलेशनमध्ये दहा संशयित आहेत.