सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध गावात आणि प्रमुख शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. धोक्याची घंटा मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी ग्रामीण भागातील तब्बल 244 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 152 पुरुष तर 92 महिलांचा समावेश होतो.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 233 आहे. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1798 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1554 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 8122 इतकी झाली आहे. यामध्ये 4875 पुरुष तर 3247 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 229 जणांचा मृत्यू झाला आहे यात 154 पुरुष तर 75 महिलांचा समावेश होतो.


जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2862 आहे .यामध्ये 1775 पुरुष 1087 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 5031 यामध्ये 2946 पुरुष तर 2085 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट 3 बार्शी 36 करमाळा 20 माढा 8 माळशिरस 60 मंगळवेढा 1 मोहोळ 7 उत्तर सोलापूर 4 पंढरपूर 46 सांगोला 38 दक्षिण सोलापूर 21असे एकूण 244 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

बार्शी 3, करमाळा 1, पंढरपूर 2,मोहोळ 3 कोरोना बाधित व्यक्ती मरण पावली आहे.